Dividends म्हणजे काय? | what are dividends?

Dividends म्हणजे काय

Dividends म्हणजे काय? | what are dividends?

Dividends म्हणजे काय? Dividends म्हणजे कंपनीच्या कमाईतून Shareholders च्या गटाला एकप्रकारे बक्षीस वितरण करणे होय. संचालक मंडळाद्वारे निर्धारित केले जाते कि अमुक डिव्हिडंड तारखेपूर्वी जोपर्यंत शेअरहोल्डर्सकडे कंपनीचे शेअर आहेत तोपर्यंत, डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांचे भागधारक लाभांश म्हणजेच डिव्हीडंड प्राप्त करत राहतील.

साधारणपणे बघितले असता, जो गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करतो त्याला लाभांश उत्पन्न (dividend income) मिळते. काही म्युच्युअल फंडही या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि त्यामुळे या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही लाभांश मिळतो. मिळालेला लाभांश हा उत्पन्नाचा एक प्रकार आहे.

त्यामुळे या उत्पन्नावर तुम्हाला tax हा भरावाच लागेल. Dividends म्हणजे काय? हे आपण समजावून घेतले.

डिव्हिडंड का दिले जातात? | Why Dividends Are Paid ?

डिव्हिडंड देणे म्हणजे गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर विश्वास ठेवून त्यांच्या समर्थनासाठी व त्यांचे कौतुक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. लाभांश दिल्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना कंपनीबद्दल अधिक दृढ विश्वास निर्माण करण्याचे एक उत्तम साधन म्हणून बघितले जाते.

सातत्यपूर्ण रीतीने नियमित कालांतराने कंपनीकडून लाभांश देणे हे गुंतवणुकदारांना कंपनीचे सामर्थ्य आणि समृद्धी हि वाढत असून अबाधित आहे हे गुंतवणूकदारांना पटवून देण्यासाठी कंपनीला फायदेशीर ठरते.

खरेपाहता, कंपन्यांना लाभांश देण्याची काही-एक गरज नसते. नवीन स्टार्टअप्स आणि बर्‍याच लहान कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारांना लाभांश देत नाहीत कारण व्यवसाय वाढवण्यासाठी जास्त नफा हा त्यांना कंपनीमध्ये परत गुंतवावा लागतो.

अनेक नामांकित कंपन्या देखील काही वेळा पैसे देत नाहीत कारण त्यांना इतर व्यवसाय विकत घेण्यासाठी किंवा इतर ठिकाणी व्यवसाय विस्तार करण्यासाठी जादा रकमेची आवश्यकता निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वच कंपन्या लाभांश देतील याची शाश्वती नसते.

लाभांशाचे विविध प्रकार | Types of Dividends

Dividends म्हणजे काय? हे आपण बघितले. आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणारी कंपनी हि भविष्यात आशादायक वाढीसह आर्थिकदृष्ट्या निरोगी असेल तर अशा कंपन्या भागधारकांना वेगवेगळ्या स्वरूपात पैसे देऊ शकतात.

लाभांश दोन मुख्य प्रकारचे आहेत जे तुम्ही कंपनीचे शेअरहोल्डर म्हणून प्राप्त करता.

A. अंतिम लाभांश म्हणजे काय ? | Final dividend
एक आर्थिक वर्ष म्हणजेच 1 एप्रिल ते त्यानंतरच्या वर्षाच्या 31 मार्च पर्यंतचा कालावधी संपल्यानंतर मिळालेला लाभांश होय.
B. अंतरिम लाभांश म्हणजे काय ? | Interim dividend
 चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीचे खाते अंतिम होण्यापूर्वी अंतरिम लाभांश जाहीर केला जातो आणि त्या आर्थिक वर्षात दिला जातो.
1. विशेष लाभांश | Special dividends

जेव्हा एखादी कंपनी वर्षानुवर्षे भरीव नफा कमावते तेंव्हा अनेकदा कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना dividends देतात. जेंव्हा कंपनीला वाटले की त्यांना आता किंवा नजीकच्या भविष्यात कॅश रकमेची गरज नाही तरच तेंव्हा लाभधारकांना Special Dividends दिले जातात.

२. रोख लाभांश | Cash dividends

हे सर्वात सामान्य प्रकारचे लाभांश आहेत आणि हे कंपनीच्या shareholders यांना रोख म्हणजेच कॅशच्या रुपात रक्कम हस्तांतरित करून दिले जातात. हे dividends जास्तप्रमाणात त्रैमासिक आधारावर दिले जातात, पण काही कंपन्या मासिक, अर्धवार्षिक किंवा एकरकमी पेमेंटची निवड आपल्या सोयीनुसार करतात.

३. स्टॉक लाभांश | Stock Dividends

कधीकधी बऱ्याच कंपन्या रोख रकमेऐवजी अतिरिक्त शेअर्सच्या स्वरूपात लाभांश गुंतवणूकदारांना देतात. भागधारकांसाठी हि बाब फायद्याची ठरते, कारण जोपर्यंत शेअरधारक हे कंपनीचे शेअर्स विकत नाहीत तोपर्यंत या स्टॉक डिव्हिडंडवर त्यांना tax आकारला जात नाही.

४. स्क्रिप लाभांश | Scrip Dividends

जेव्हा एखाद्या कंपनीकडे जवळच्या भविष्यात Dividend जारी करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो, तेव्हा ती स्क्रिप लाभांश जारी करते. जे एकप्रकारचे वचनपत्र (promissory note) आहे जे नंतरच्या तारखेला भागधारकांना पैसे देण्याचे वचन देते.

५. मालमत्ता लाभांश | Property Dividends

हा प्रकार फार कमी प्रमाणात बघायला मिळतो. काही कंपन्या रोख रकमेऐवजी भागधारकांना मालमत्ता देऊन लाभांश देतात. प्रत्येक भागधारकाला किती लाभांश मिळावे हे निर्धारित करण्यासाठी ते मालमत्तेचे वाजवी-बाजार मूल्य वापरतात.

6. लिक्विडेटिंग डिव्हिडंड | Liquidating Dividends

आंशिक partial किंवा पूर्ण लिक्विडेशन दरम्यान भागधारकांना दिलेला हा लाभांशाचा एक प्रकार आहे. हे Dividends सहसा करपात्र ठरत नाहीत.

हेही वाचा : स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?

Dividends म्हणजे काय min

लाभांश किती वेळा मिळतो ? | How often are dividends paid?

बहुतेक सर्वच कंपन्या त्यांच्या भागधारकांना तिमाही आधारावर (Quarterly Basis) लाभांश देते. पण हे किती वेळा द्यायला हवे यासाठी कोणताही एक निश्चित नियम ठरवलेला नाही. कंपनीचे संचालक मंडळ कंपनी किती पैसे कमवते आणि तिची उद्दिष्टे काय यावर आधारित मुद्यांचा विचार करून भागधारकांना किती प्रमाणात आणि किती वेळा लाभांश द्यायचे हे सहसा ठरवत असते.

कंपनीने एकदा व्यवसायात नफा कमावला की, ते पैसे परत व्यवसायात गुंतवू शकते, आणीबाणीच्या खर्चासाठी साठवून ठेवू शकते, भागधारकांकडून आपल्या कंपनीचे स्टॉक परत खरेदी करू शकते किंवा भागधारकांना लाभांश देऊ शकते हे सर्वस्वी कंपनीच्या संचालक मंडळावर अवलंबुन आहे

लाभांश करपात्र आहेत का ? | Are Dividends Taxable?

हो, लाभांश सामान्यत: करपात्र उत्पन्न मानले जातात. 1 एप्रिल, 2020 पूर्वी, लाभांश प्राप्त करणार्‍या व्यक्तींसाठी करमुक्त होता. वित्त कायदा 2020 मध्ये लाभांश कर आकारणीची पद्धत बदलली आहे त्यामुळे 1 एप्रिल 2020 रोजी किंवा त्यानंतर मिळालेला सर्व लाभांश गुंतवणूकदार/भागधारक यांच्यासाठी करपात्र आहे.

परदेशी कंपनीकडून मिळालेला लाभांश करपात्र असतो. त्यावर “इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न” (income from other sources) या शीर्षकाखाली कर आकारल्या जातो. परदेशी कंपनीकडून मिळालेला Dividend करदात्याच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये समाविष्ट केला जाईल आणि करदात्याला लागू असलेल्या दरांनुसार त्यावर कर आकारला जाईल.

लाभांश उत्पन्नासाठी सूट मर्यादा काय आहे ? What is the exemption limit for dividend income?

भारतात, जर एखाद्या व्यक्तीला किंवा हिंदू अविभक्त कुटुंबाला (HUF) मिळालेला एकूण लाभांश रु. 5,000 मर्यादेपर्यंत आयकरातून मुक्त ठरतो. आर्थिक वर्ष 2021-2022 साठी भारतातील लाभांश उत्पन्नासाठी सूट मर्यादा रु. 5,000 ठरविण्यात आली आहे. म्हणजेच या रकमेपर्यंत मिळालेला कोणताही लाभांश हा करपात्र नाही. या मर्यादेपेक्षा जास्त मिळालेला कोणताही लाभांश लागू दराने आयकराच्या अधीन आहे.

dividend देणाऱ्या शेअरमध्ये तुम्ही पैसे का गुंतवले पाहिजेत ? Why should you invest in dividend stocks?

आपण कंपनीच्या खरेदी केलेल्या शेअर्स पेक्षा त्या कंपनीकडून लाभांश स्वरुपात आपल्याला नेहमी एक उत्पनाचा स्रोत तयार होऊ शकतो आणि त्याचा फायदा हा दूरगामी ठरू शकतो. लाभांश मधून मिळणाऱ्या रकमेमधून आपण पुन्हा एखाद्या नवीन कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपला पोर्टफ़ोलिओ चांगला भक्कम करू शकतो.

लेख शेअर करा.
– पुढील लेख –

image credit : flaticon

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top