6 Things to do Before you Start Investing

शेअर बाजार किंवा अन्य ठिकाणी आपल्या पैशांची गुंतवणूक करताना आपण कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करायला हवा हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. नाहीतर तुम्ही केलेली गुंतवणूक फारकाळ टिकणार नाही. असे झाले तर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळणे कठीण होईल. त्यासाठी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी खाली दिलेल्या किमान ६ गोष्टी (6 Things to do Before you Start Investing) तुम्ही ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

Things to do Before you Start Investing

emergency fund finochart

1. Build an Emergency Fund

कोणतीही वाईट परिस्थिती सांगून येत नाही. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक तेवढी रक्कम किंवा पैसा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला अत्यावश्यक सेवांसाठी किती पैसा लागणार आहे याचा हिशोब काढून तो पैसा बाजूला ठेवला पाहिजे.

आजारपण, शिक्षण, पर्यटन अशा कोणत्याही माध्यमातून तुम्हाला या पैशांची गरज भविष्यात भासू शकते. तेंव्हा हा पैसा तुम्ही गुंतवणुकीतून बाजूला काढला पाहिजे. कारण एकवेळ पैसे गुंतवले तर तुम्हाला त्यामधून वारंवार रक्कम काढणे फायद्याचे ठरणार नाही असे केले तर तुमचा परतावा Return कमी होत जाईल.

किमान पुढील १ वर्ष चालेल एवढा Emergency Fund तुमच्याजवळ असला पाहिजे.

pay down your debt finochart

2. Pay Down your Debt

तुमच्याकडे आधीच जर इतरांचे कर्ज असेल तर तुम्ही त्या कर्जाची परतफेड न करता गुंतवणूक करणे चुकीचे आहे. कारण पैशाची गुंतवणूक करताना तुमच्या गुंतवणुकीचे उधिष्ट किमान ३ ते ५ वर्षासाठी असायला हवे. यापेक्षा कमी कालावधीसाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत नाही.

तुमच्याकडे जर कर्ज शिल्लक असेल तर शांतपणे तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही. कधी-कधी कर्ज दात्यांकडून सक्तीने कर्ज वसुली केली जाते अशावेळी तुम्ही त्या पैशांची गुंतवणूक केली असेल तर कर्ज देणारी संस्था किंवा बँक न्यायालयीन आदेशाद्वारे तुमची गुंतवणूक गोठवून त्यांच्या कर्जाची परतफेड करून घेऊ शकते.

अशावेळी तुम्हाला त्या गुंतवणुकीतून कोणताच फायदा मिळत नाही आणि भविष्यात मिळणाऱ्या परताव्या पासून तुम्हाला लाभ होत नाही.

goals and priorities finochart

3. Define Goals and Priorities

आपली गरज आणि आवश्यकता यामध्ये तुम्हाला फरक ओळखता आला पाहिजे. तुमची आत्ताची आर्थिक गरज काय आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा निधी आहे का? या प्रश्नांचे उत्तर तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी शोधले पाहिजेत.

अत्यावश्यक सेवांकरिता पैसा बाजूला काढल्यानंतर दैनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ किती रक्कम शिल्लक असायला हवी याचे गणित तुम्ही ठरवले पाहिजे. सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर उरलेली रक्कम तुम्ही गुंतवणूक करायला हवी. त्यामुळे तुम्ही जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करून अधिकाधिक फायदा घेऊ शकता.

know your cashflow finochart

4. Know your Cash Flow

तुमच्या जवळ येणारा पैसा कोणत्या मार्गांनी येतो आहे आणि पैसा येण्याचे मार्ग किती शास्वत, विश्वासपूर्ण आणि कायम आहेत या गोष्टीची तुम्ही खातरजमा पैशाची गुंतवणूक करण्यापूर्वीच केली पाहिजे. कारण गुंतवणूक करताना जर जास्त कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकला नाही तर त्यापासून तुम्हाला जास्त लाभ होणार नाही.

म्हणून तुमची उत्पन्नाची साधने हि तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला पूरक आणि पोषक असायला हवी. जेणेकरून तुमच्या गुंतवणुकीत खंड पडणार नाही. एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधने निर्माण करण्यावर तुमचा भर असायला हवा. म्हणजे एखाद्यावेळी उत्पन्नाचे एखादे साधन बंद पडल्यास त्याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होणार नाही.

net wort finochart

5. Track your Net-Worth

आजरोजी तुमच्याजवळ किती संपत्ती आहे? ती कोण-कोणत्या प्रकारची आहे?, चल आहे कि अचल आहे? त्यापैकी किती संपत्ती रोख स्वरुपात आहे? याची पूर्ण माहिती तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती नसेल तर तुम्ही गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेऊ शकत नाही.

उदाहरणार्थ : एखाद्याची महिन्याची कमाई जर १०००० असेल तर असा व्यक्ती जास्तीत-जास्त त्यातील २००० रुपये गुंतवणूक करू शकतो. यापेक्षा जास्त गुंतवणूक अडचणीची ठरू शकते. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा भागवणे कठीण होऊन जाईल.

म्हणूनच कोणत्याही माध्यमामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची उत्पन्न आणि एकूण संपत्ती याचा ताळमेळ घेऊनच गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी.

basics of investing finochart

6. Understand the Basics of Investing

गुंतवणुकीचे मूळ कारण तुम्हाला जाणून घेता आले पाहिजे. तुम्ही केलेली गुंतवणूक हे फक्त इतरांना दिखाव्यासाठी नसून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असायला हवी. गुंतवणुकीचे कोणतेही ज्ञान प्राप्त न करता फक्त कुणीतरी मित्र, नातेवाईक सांगतो म्हणून डोळे बंद करून विश्वास ठेऊन गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका.

आपला अभ्यास आपण स्वतःच करायला हवा. कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करणे सध्याच्या परिस्थितीत फायद्याचे राहील याचे ज्ञान घ्या. छोटे-छोटे उधिष्ट ठेऊन गुंतवणुकीला सुरुवात करा. सुरुवातीला एकदम मोठी रक्कम गुंतवू नका. म्युचुअल फंड मध्ये SIP करण्याला प्राधान्य द्या.


लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top