7 Golden Rules of Trading In Marathi | ट्रेडिंगचे ७ सोनेरी नियम
शेअर बाजारामध्ये त्र्दिंग करताना नियमांच्या अशीन राहून ट्रेडिंग केली तर शेअर बाजारासारखा पैसा मिळवून देणारा दुसरा मार्ग तुम्हाला सापडणार नाही. त्यसाठी शेअर बाजाराचे काही अलिखित नियम आहेत त्यांचे तंतोतंत पालन केल्यास यशस्वी ट्रेडर बनण्यास नक्की मदत होईल. असेच शेअर बाजारातील ट्रेडिंगचे ७ सोनेरी नियम | 7 Golden Rules of Trading In Marathi आपण मराठीमध्ये शिकणार आहोत.
- १. मजबूत पाया असणारी कंपनी निवडा | Choose Strong Fundamental Companies
- २. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे टाळा | Avoid investing in penny stocks
- ३. जास्त लोभी बनू नका | Avoid Being Greedy
- ४. विश्वसनीय ब्रोकर सोबतच जा | Work with Reliable Intermediaries
- ५. स्वतः अभ्यास करा | Do Your Own Research Before Investing
- ६. एकाच स्टॉकमध्ये सर्व पैसा गुंतवू नका | Do Not Invest In a Single Stocks
- ७. जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करा | Keep Invested For Long-Term
१. मजबूत पाया असणारी कंपनी निवडा | Choose Strong Fundamental Companies
शेअर बाजारामध्ये अधिक नफा मिळवायचा असेल तर नेहमी मजबूत फंडामेंटल्स असणाऱ्या कंपन्यांची निवड करा. मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपन्या ह्या शेअर बाजारातील चढउतार सहन करण्यास सक्षम असतात कारण शेअर बाजारात चढ-उतार नेहमी येत असतात आणि त्यावेळी ज्या कंपनीचे भविष्यातील नियोजन, खर्च आणि बचत यांचे प्रमाण तसेच फंडामेंटल्स मजबूत नाहीत अशा कंपन्या दिवाळखोरीत जातात.
त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केलेला पैसा बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याव्यतिरिक्त, चांगल्या कंपनीचे शेअर महाग असले तरी ते दीर्घकालीन चांगले परतावा returns देतात आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक लाभदायक ठरतात.
२. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे टाळा | Avoid investing in penny stocks
काही लोक शेअर बाजामध्ये झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न घेऊन येतात आणि पेनी स्टॉकमध्ये आपले अमुल्य पैसे गुंतवणूक करतात. त्यांच्या मते चांगल्या कंपनीचे महाग शेअर घेण्यापेक्षा लहान कंपनीचे कमी किमतीचे जास्त शेअर घेऊन आपण लगेच श्रीमंत होऊ शकतो पण असे कधीच होत नाही. कारण चांगल्या कंपनीचे (जसे रिलायंस ) शेअर हे महाग जरी असले तरी ते खात्रीलायक असतात.
त्यांच्यापासून मिळणारा परतावा returns कमी जरी असला तरी ती कंपनी बुडण्याची शक्यता फार कमी असते. त्या उलट कमी भरवशाच्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी असते (पेनी स्टॉक) पण त्यांच्यामध्ये गुंतवलेला पैसा कधी बुडेल याची शाश्वती नसते.
३. जास्त लोभी बनू नका | Avoid Being Greedy
शेअर बाजार हा अत्यंत अस्थिर आणि अप्रत्याशित म्हणजेच ज्याचा कुणीच थांगपत्ता सांगू शकत नाही असा आहे. मोठमोठ्या इंव्हेस्टिंग एजन्सीज यांनासुद्धा या बाजाराचा अंदाज बांधणे कठीण असते अशावेळी आपल्या सारख्या नवशिक्या लोकांनी सावधगिरी बाळगूनच आपले निर्णय घेतले पाहिजेत.
त्यासाठी एखाद्या अस्थिर कंपनीच्या कमी किमतीच्या शेअरमध्ये तुम्हाला गुंतवणूक करून फार मोठा नफा मिळवून देतो असे कुणी सांगत असेल तेंव्हा तुम्हाला या गोष्टींची भुरळ पडायला नको. वेळीच सावध होऊन अशा फसव्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे टाळा आणि आपले अमुल्य पैसे वाचवा.
४. विश्वसनीय ब्रोकर सोबतच जा | Work with Reliable Intermediaries
शेअर बाजारात नेहमी विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित मध्यस्थांशी (ब्रोकर) व्यवहार करणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर असते. सुरक्षित ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्याव्यतिरिक्त, असे ब्रोकर अनेक मूल्यवर्धित सेवा (value-added services) देतात. असे ब्रोकर त्यांच्या ग्राहकांना शेअर मार्केटबद्दल संशोधन अहवाल research reports आणि इतर उपयुक्त माहिती पुरवण्याचे काम करतात.
आजरोजी मार्केटमध्ये खूपसारे डिस्काउंट ब्रोकर उपलब्ध आहेत जसे zerodha, angel one, grow इत्यादी सर्वांची माहिती करून घेऊन यापैकी खात्रीलायक ब्रोकर आपण निवडला पाहिजे.
अमुक एखादा मित्र सांगतोय म्हणून तुम्हाला माहिती नसलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका.
५. स्वतः अभ्यास करा | Do Your Own Research Before Investing
अमुक एखादा मित्र सांगतोय म्हणून आपण लालसेपोटी आपल्याला माहिती नसलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. आजकाल टेलिग्राम आणि Whatsapp च्या माध्यमातून ज्ञान पाजणाऱ्या तथाकथित जाणकारांची संख्या वाढलेली आहे.
अशा सल्लागारांपासून आपण नेहमी सावध असायला पाहिजे. असे लोक नफा मिळवलेले चुकीचे आणि बनावट स्क्रीनशॉट दाखवून तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढू शकतात अशावेळी वेळीच सावध होऊन अशा फसव्या जाहिरातींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. त्याउलट स्वतः थोडी मेहनत घेऊन अभ्यास करून चांगल्या कंपनीची निवड करूनच आपले पैसे त्यामध्ये गुंतवले पाहिजेत.
६. एकाच स्टॉकमध्ये सर्व पैसा गुंतवू नका | Do Not Invest In a Single Stocks
जाणकार इन्व्हेस्टर आपला सर्व पैसा एकाच स्टॉकमध्ये कधीच गुंतवत नाहीत. ते नेहमी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उत्तम आणि मजबूत पाया असणाऱ्या कंपन्यांची निवड करून त्यांच्यामध्ये आपल्या पैशाची योग्य विभागणी करूनच गुंतवणूक करतात. त्याचा फायदा असा होतो, जर एखाद्या क्षेत्रामध्ये मंदी आली किंवा इतर कारणांनी त्या क्षेत्रातील कंपनीच्या स्टॉकची किंमत घसरली तरी इतर कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवलेल पैसे ती तुट भरून काढतात.
याउलट नवशिके गुंतवणूकदार कोणताही अभ्यास न करता मनात येईल त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये आपला सर्वच पैसा गुंतवतात आणि जर त्या कंपनीचे दिवाळे निघाले तर यांचेसुद्धा दिवाळे निघते आणि मग असे लोक शेअर मार्केटच खराब आहे आणि हे आपल्या सारख्यांचे काम नाही असे म्हणत मार्केटला दोष देत बाजारातून बाहेर पडतात.
७. जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करा | Keep Invested For Long-Term
काही लोक आज एखाद्या कंपनीच्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले म्हणजे लगेच एक-दोन दिवसांत त्यांना त्यापासून भरपूर परतावा returns हवे असतात. पण शेअर बाजारात असे होत नाही जर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांमधून चांगला परतावा मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या कंपनीला काही वेळ द्यावाच लागतो. कारण एखाद्या कंपनीच्या स्टॉकची किंमत तेंव्हाच वाढते जेंव्हा कंपनी चांगले काम करून नफा मिळवते आणि अधिकाधिक गुंतवणूकदार त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये आपला पैसा गुंतवतात.
या सर्व गोष्टींसाठी काही कालावधी लागणारच, नेमका किती कालावधी लागेल हे कंपनी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते, त्याच बरोबर त्या क्षेत्रामध्ये सध्या काही सकारात्मक सरकारी धोरण येणार आहे का?, कंपनीचे काही मोठे प्रोजेक्ट पूर्ण होणार आहेत का ? अशा विविध बाबींचा कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीवर प्रभाव पडतो आणि स्टॉकची किंमत घटते किंवा वाढते. त्यामुळे बाजारात पैसा गुंतवताना नेहमी long-term चा विचार करूनच आपला पैसा गुंतवावा जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक नफा मिळवता येतील.
लेख शेअर करा.
image credit : flaticon