BankNifty Options Trading
शेअर बाजारामध्ये Equity Cash ट्रेडिंगचा जर तुम्हाला किमान चार ते पाच वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही BankNifty Options Trading चांगल्या प्रकारे करू शकता. पण याला अपवाद सुद्धा काही ट्रेडर असू शकतात. काहींनी एक-दोन वर्षातच BankNifty Options Trading मध्ये कौशल्य प्राप्त केले आहे. हे कौशल्य जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे. यातीलच काही महत्वाच्या बाबींचा उलगडा आपण या लेखामध्ये करणार आहोत.
1. Always Trade with Trends
Banknifty मध्ये ट्रेड करत असताना मार्केटची दिशा बघूनच तुम्ही ट्रेड घेतला पाहिजे. कारण बँकनिफ्टी मध्ये एकूण १२ मोठ-मोठ्या Banking Stocks चा समावेश आहे. जर शेअर बाजारामध्ये मंदीचे वातावरण असेल आणि सर्वच बँकाचे शेअर पडत असतील अशावेळी तुम्ही जर Call Option विकत घेतले तर त्या ठिकाणी तुमचा Stop Loss Hit होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणून मार्केट ज्या दिशेला जात आहे त्याच दिशेने तुम्ही तुमचे ट्रेड प्लान केले पाहिजे. मार्केटच्या दिशेने घेतलेल्या ट्रेड मध्ये तुम्ही बँक निफ्टीची जास्त मोठी हालचाल पकडू शकता. अशावेळी तुमची रिस्क सुद्धा कमी होते.
2. Calculate your Risk
बँकनिफ्टी हा सर्वात अस्थिर निर्देशांक (Volatile Index) आहे. अगदी काही क्षणामध्ये बँकनिफ्टी मध्ये १०० ते ३०० अंकाची वाढ किंवा घसरण होत असते. अशावेळी तुम्ही कोणत्याही ट्रेड मध्ये Entry घेण्यापूर्वी तुमची Risk आधीच ठरवून घेतली पाहिजे. जर असे केले नाही तर नियोजनबद्ध ट्रेड न केल्यामुळे तुम्हाला फार मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
उदाहरणार्थ : तुम्ही एखादा १०० किंमत असलेला Call Option विकत घेतला आणि ट्रेड सुरु झाला. पण या ठिकाणी जर तुम्ही या ट्रेड मध्ये किती loss सहन करणार आहात हे ठरवले नाही तर नेमक्या कोणत्या किंमतीवर तुम्हाला ट्रेड मधून बाहेर पडायचे आहे याचा अंदाज लागणार नाही.
यासाठी Call Option विकत घेतल्यानंतर तुम्ही त्याची किंमत ८० पर्यंत खाली आल्यावर ट्रेडमधून बाहेर पडावे लागणार हे आधीच ठरवल्यास तुमचे मोठे नुकसान होणार नाही.
3. Trade only when Markets are Liquid
कधी-कधी बाजारामध्ये एक-दोन दिवसांपूर्वी मोठी हालचाल होऊन जाते आणि नंतरच्या काही दिवसांसाठी बाजारांमध्ये कोणतीच मोठी हालचाल न होता बाजार शांत असतात. अशा परिस्थितीत घेतलेले बहुतांश ट्रेड फसतात. त्यामुळे जेंव्हा बाजारामध्ये कोणतीच हालचाल होण्याची शक्यता नाही तेंव्हा बाजारापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरते.
कारण बँकनिफ्टी मध्ये ट्रेड घेतल्यानंतर जर कोणत्याच दिशेला हालचाल झाली नाही तर तुमचे Option Premium कमी-कमी होत जाऊन तुम्हाला नुकसान होऊ शकते. म्हणून “बाजार शांत असेल तर तुम्ही शांत राहणे हेच फायद्याचे आहे.”
4. Always Use Stop Loss
ट्रेड घेण्यापूर्वी तुम्ही कोणत्या ठिकाणी त्या ट्रेड मधून बाहेर पडणार आहात हे निश्चित केलेले असले पाहिजे. नाहीतर ट्रेड मध्ये घाई-घाईने Entry तर तुम्ही कराल पण चालू मार्केटमध्ये तुमचा ट्रेड फसल्यावर नेमके कोणत्या ठिकाणी बाहेर पडायचे हे तुम्हाला कळणार नाही आणि तुमचे नुकसान वाढतच जाईल.
कधी-कधी बँकनिफ्टी मध्ये खूप मोठी हालचाल काही क्षणात होते अशावेळी जर तुम्ही Stop Loss लावलेला नसेल तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊन पूर्ण Demat Account रिकामे होऊ शकते. म्हणून कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी Stop Loss लावण्याची सवय तुम्ही स्वतःला लावली पाहिजे.
5. Let Your Profit Runs
बहुतांश ट्रेडर बँकनिफ्टी मध्ये ट्रेड घेतल्या नंतर त्यांना जर ट्रेडिंग स्क्रीनवर profit दिसायला लागला कि लगेच उतावीळ होऊन तो Profit Book करतात आणि ट्रेड मधून बाहेर पडतात. याउलट त्या ट्रेड मध्ये जर Loss होत असेल तर तो Loss लवकर बंद न करता तसाच ट्रेड सुरु ठेवतात आणि मोठा loss घेऊन ट्रेड मधून बाहेर पडतात.
जर तुम्हाला बँकनिफ्टी सारख्या इंडेक्स मध्ये नेहमीसाठी टिकून राहायचे असेल तर तुमचे Winning Trade हे तुम्ही Trailing Stop Loss चा वापर करून तुमचे ठरलेले टार्गेट येईपर्यंत चालूच ठेवण्याची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे.
6. Avoid Overtrading
बँकनिफ्टी मध्ये ट्रेड करणारे बहुतांश ट्रेडर सकाळच्या सत्रामध्ये चांगला नफा कमवतात पण नंतर दुपारी जेंव्हा मार्केट शांत असते आणि कोणतीच हालचाल करत नाही त्यावेळी अनावश्यक ट्रेड घेऊन सकाळी मिळवलेला पूर्ण नफा गमावून बसतात. गेलेला profit पुन्हा मिळविण्यासाठी Overtrading करून आपला loss वाढवून घेऊ नका.
ट्रेडिंग विश्वामध्ये Overtrading केल्याने सर्वात जास्त loss ट्रेडर करत असतात. या पासून वाचायचे असेल तर Overtrading करणे तुम्ही थांबवले पाहिजे. आज जर loss झाला तर तो मान्य करून त्या दिवसासाठी ट्रेडिंग बंद करून आपला वेळ कुटुंबासाठी द्यायला हवे.
असे केल्याने तुमचा मोठा loss होणार नाही आणि तुम्ही उद्या पुन्हा चांगल्या तयारीने ट्रेडिंग करू शकाल.
7. Never Trade Beyond Your Risk
ट्रेडिंग करताना आपली loss सहन करण्याची क्षमता तुम्हाला माहित असायला हवी. प्रमाणापेक्षा मोठी रक्कम बाजारामध्ये गुंतवून तुम्ही एखाद्यावेळी चांगला नफा कमवू शकता पण हे रोज घडणार नाही. त्यासाठी आपली जेवढा loss सहन करण्याची क्षमता आहे तेवढाच loss घेऊन तुम्ही ट्रेड मधून बाहेर पडले पाहिजे.
एका दिवसाला तुमच्या कॅपिटल वर तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याला मर्यादा घालून द्या. उद्यासाठी कॅपिटल जर शिल्लक राहले नाही तर तुम्ही ट्रेडिंग कसे करणार याचा विचार सतत तुमच्या डोक्यामध्ये असायला हवा.
8. Quick Entry and Exit
बँकनिफ्टी मध्ये जर तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेड करत असाल तर तुम्हाला Quick Entry आणि Exit करता आले पाहिजे. नाहीतर अति लोभी बनून हाती आलेला चांगला profit गमावू नका. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि व्यावहारिक दृष्टीकोन ठेऊन ट्रेडिंग करण्याची कला आत्मसाद करण्याचा सराव करा.
Banknifty Scalping मध्ये जलद निर्णय घेणे खूप आवश्यक असते. BankNifty Options Trading करताना तुम्हाला जास्तवेळ ट्रेड मध्ये थांबता येत नाही कारण वेळेबरोबर BankNifty Options ची किंमत कमी-कमी होत जाते. हे टाळण्यासाठी तुम्हाला ट्रेड मध्ये Quick Entry आणि Exit करता आले पाहिजे.
9. Control Your Emotions
बँकनिफ्टी मध्ये ट्रेडिंग करताना आपल्या भावनांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. नाहीतर आपण बँकनिफ्टी चार्ट कोणताही सेटअप बनलेला नसताना सुद्धा स्वतःच्या इच्छेसाठी ट्रेड घेतो आणि नंतर तो ट्रेड फसल्यावर मार्केटला दोष देतो. कधीकधी एखादा profit देणारा ट्रेड फक्त profit ची भीती वाटल्यामुळे आपण लगेच Exit करून त्यातून बाहेर पडतो आणि चांगल्या profit पासून वंचित राहतो.
म्हणूनच ट्रेडिंग करताना तुमच्या भावनांना आवर घालायची चांगली सवय स्वतःला घालून द्या. ट्रेड घेतल्यानंतर एकतर तुमचे Profit Target Hit व्हायला पाहिजे नाहीतर Stop Loss तरी जायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेड मधून बाहेर पडता कामा नये.
10. Don’t do Revenge Trading
BankNifty Options Trading असो किंवा इतर कोणत्याही ट्रेडिंग मध्ये सर्वात जास्त नुकसान फक्त Revenge Trading केल्यामुळे होत असते. Revenge Trading मध्ये ट्रेडर चुकीच्या ट्रेड मधून झालेल्या नुकसानासाठी मार्केटला दोष देऊन मार्केट सोबत भांडत असतो.
जणू काही मार्केटनेच त्याच्याकडून पैसे हिरावून घेतले अशा भावनेने त्याचा बदला घेण्यासाठी चुकीचे ट्रेड घेऊन आपले आणखी जास्त नुकसान करतो. ट्रेडिंग करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा “ ट्रेडिंग मध्ये मार्केट हे सर्वात उच्च पातळीवर असते आणि त्यासोबत तुम्ही लढाई कधीच जिंकू शकत नाही.”
म्हणून मार्केटच्या दिशेने ट्रेड करा मार्केटच्या विरुद्ध दिशेला जाऊन ट्रेड करू नका. हे जेंव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी ट्रेडर व्हाल.