शेअर्सचे बायबॅक म्हणजे काय? | Buyback of Shares

buyback of shares

शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असलेल्या आणि चांगल्या कंपन्या ह्या फार कमी आहेत. अशा काही कंपन्या त्यांच्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतणूकदारांना खुश करण्यासाठी चांगला profit देण्यासाठी प्रयत्न करत असते त्यातीलच एक संधी म्हणजे शेअर्सचे बायबॅक buyback of shares करणे होय.

अनेक कंपन्या आता शेअर्सचे बायबॅक करण्यावर जास्त भर देत आहेत.म्हणूनच शेअर्सचे बायबॅक करणे म्हणजे काय? buyback of shares हे आपण येथे समजावून घेणार आहोत.

शेअर्स बायबॅकचा अर्थ

बायबॅक, म्हणजेच परत विकत घेणे होय. याचाच अर्थ, जेव्हा एखादी कंपनी त्याच्या भागधारकांकडून शेअर्स परत स्वतः खरेदी करते, त्याला बायबॅक ऑफ शेअर्स buyback of shares असे म्हणतात. (कधी-कधी जास्त किंमतीला)

कंपनी आपलेच विकलेले शेअर बायबॅक का करते याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यामागील मुख्य कारण म्हणजे मूल्यांकन Valuation वाढवणे होय. या मार्गाचा वापर करून कंपनी स्वतः स्वतःमध्ये गुंतवणूक करते. शेअर बायबॅकमुळे कंपनीच्या बाजारातील समभागांची संख्या कमी होते आणि त्यामुळे त्यांची किंमत भविष्यात वाढू शकते.

शेअर बायबॅक करण्याची कारणे

जर एखादी कंपनी शेअर बाजारातून स्वतःचे शेअर्स परत विकत घेत असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण किंवा उद्धिष्ट असणारच. शेअर बायबॅक करण्याची कारणे खालीप्रमाणे असू शकतात.

1. शेअर्सच्या संख्या कमी करणे –

एखाद्या कंपनी जर स्वतचे शेअर बायबॅक करत असेल तर त्यामागचे प्रमुक कारण म्हणजे मार्केटमधील कंपनीच्या शेअर्सची संख्या कमी करणे होय. त्यामुळे बाजारातील कंपनीच्या स्टॉकची मागणी वाढते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होतो.

2. कंपनीची मालकी एकत्र करणे –

जेव्हा-जेंव्हा तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्हाला विशिष्ट अधिकारांसह कंपनीची आंशिक मालकी (Ownership) मिळत असते. त्यामुळे कंपनीच्या Management Bord ची मालकी कंपनीमध्ये कमी-कमी होत जाते. त्यामुळेच ही मालकी मजबूत करण्यासाठी, कंपनी स्वतःचे शेअर स्वतः बाय बॅक करते.

Buyback of Shares in marathi

3. कंपनीच्या मुल्यांकनात सुधारणा

बहुतेकवेळा, सर्व कंपन्या buyback of shares चा पर्याय तेंव्हाच निवडतात जेव्हा त्यांना असे वाटते की कंपनीचे मूल्य Valuation सध्या कमी आहे. जर एखाद्या कंपनीने आपले शेअर्स जास्त किमतीला परत विकत घेतले तर त्यामुळे शेअर्स मधील गुंतवणूकदारांना विश्वास मिळतो की भविष्यात कंपनी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीला केवळ कंपनीचे Valuation वाढत नसून त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेण्यास देखील मदत होते.

4. गुंतवणूकदारांसाठी बक्षीस –

शेअ हाच बाजारामध्ये पैसे गुंतवताना “भविष्यात पैसे कमवणे” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक व्यक्ती बाजारामध्ये पैसे गुंतवत असते. हे लक्षात कंपनी शेअर्सचे बायबॅक करून भागधारकांना त्यांचा विश्वास आणि गुंतवणुकीसाठी बक्षीस म्हणून पैसे परत देण्याचा प्रयत्न करते. कंपनीसाठी कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा हा एक चांगला आणि कर-प्रभावी मार्ग आहे.

शेअर्स बायबॅकसाठी अर्ज कसा करावा?

आता तुम्हाला बायबॅक म्हणजे काय हे समजले असेलच त्यामुळे तुम्हाला जर buyback of shares साठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेणे महत्वाचे आहे. परंतु त्याआधी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात की नाही हे जाणून घेतले पाहिजे. शेअर बायबॅकसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

  • रेकॉर्ड तारखेला किंवा त्यापूर्वी तुम्ही सदर कंपनीचे शेअर्स धारण केलेले असले पाहिजेत.
  • एंटाइटलमेंट रेशोनुसार किमान शेअर्स धारण करण्याच्या अटीनुसार तुमच्याजवळ तेवढे शेअर असणे आवश्यक आहे.
  • उदाहरणार्थ, जर गुणोत्तर 10 :1 असेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही धारण केलेल्या त्या कंपनीच्या प्रत्येक 10 शेअरमागे, तुम्ही फक्त एका शेअरच्या बायबॅकसाठी पात्र असाल. म्हणूनच तुमच्या खात्यात त्या कंपनीचे किमान 10 शेअर्स असणे आवश्यक आहे.

शेअर बाजारातून दररोज ५०० रुपये कसे कमावता येतील?

How to apply for share buyback

शेअर्सच्या बायबॅकसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • १. तुमच्या लॉगिन क्रेडेंशियलसह (माहितीसह) तुमच्या ट्रेडिंग अॅपमध्ये लॉग इन करा.
  • २. डॅशबोर्डवरील इच्छित पर्यायावर क्लिक करा.
  • ३. अनेक ट्रेडिंग अॅप्समध्ये तुम्हाला कॉर्पोरेट ऍक्शन्स नावाचा टॅब दिसेल.
  • ४. आता तुम्हाला दिसेल की कंपनीचे शेअर्स बायबॅकसाठी उपलब्ध आहेत.
  • ५. कंपनीने जारी केलेला निविदा विनंती अर्ज भरा.
  • ६. तुमचा तपशीलांमध्ये डीपी आयडी, शेअर्सची संख्या इ. माहिती भरा.
  • ७. तुम्ही जेव्हा कंपनीचे शेअर्स बायबॅकसाठी अर्ज करता तेव्हा काही ब्रोकर TPIN देखील विचारतात.

शेअर्स बायबॅकचे फायदे

१. शेअर्स बायबॅक केल्याने कंपनीचे मूल्यांकन सुधारते. जेव्हा एखाद्या कंपनीला वाटते की तिच्या कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य कमी झाले आहे, तेव्हा ते buyback of shares करतात.

२. गुंतवणूकदारांमध्ये कंपनीबद्दल विश्वास नि

र्माण करते की कंपनीकडे उच्च वाढीची क्षमता आहे आणि भविष्यासाठी कंपनीकडे उत्तम योजना आहेत.

३. बायबॅक हा शेअर गुंतवणूकदारांना प्रोत्साहित आणि बक्षीस देण्याचा कर-कार्यक्षम मार्ग आहे. शेअर्सच्या बायबॅकच्या विपरीत, Dividends वर तीन वेळा कर आकारला जातो

४. जेव्हा एखादी कंपनी बायबॅकची घोषणा करते, तेव्हा वाढलेली मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे शेअरच्या किमती अचानक वाढतात त्यामुळे हि संधी काही ट्रेडरसाठी फायदेशीर ठरते.

५. बाजारातील शेअर्सच्या संख्येत घट झाल्याने कंपनीची EPS (प्रति शेअर कमाई) वाढते

लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top