Difference between SIP and Lumpsum

SIP आणि Lumpsum मध्ये काय फरक आहे?

शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना SIP आणि Lumpsum हे शब्द नेहमी कानावर पडतात पण या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे SIP आणि Lumpsum मध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊ. What is difference between SIP and Lumpsum ?

SIP म्हणजे काय?

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP ही शेअर बाजारातील अशी सुविधा आहे जी गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या इच्छेप्रमाणे म्युच्युअल फंड किंवा stocks मध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुरवली जाते. एसआयपी मध्ये गुंतवणूकदार त्यांना हव्या तेवढ्या अंतराने आणि रकमेने शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो.

SIP मध्ये आपण काही ठराविक रक्कम साप्ताहिक/मासिक/त्रैमासिक/अर्धवार्षिक किंवा वार्षिक अंतराने म्युच्युअल फंड किंवा stocks मध्ये गुंतवत असतो. SIP करण्यासाठी तुमच्याकडे फार मोठ्या रकमेची आवशकता नसते. कमीत-कमी रकमेमध्ये तुम्ही SIP सुरु करू शकता.

sip Investment

Lumpsum गुंतवणूक म्हणजे काय?

शेअर बाजामध्ये गुंतवणूक करताना एखाद्या वेळेस आपण आपल्याजवळ उपलब्ध असलेली रक्कम एकाचवेळी बाजारामध्ये एकतर एखाद्या कंपनीच्या Stock मध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो त्यावेळी केलेली गुंतवणूक हि एकाच वेळेस आणि एकरकमी असते यालाच Lumpsum गुंतवणूक असे म्हणतात. Lumpsum गुंतवणूक करताना आजरोजी असलेल्या बाजार भावामध्ये गुंतवणूक केली जाते.

हेही वाचा : Mutual Fund म्हणजे काय?

SIP आणि Lumpsum सोपे उदाहरण

उदाहरणार्थ, तुमच्याकडे ₹10000 आहेत आणि त्याची गुंतवणूक करायची आहे तेंव्हा, तुम्ही एकतर सर्व रक्कम एकरकमी एकाच वेळेस गुंतवणूक करू शकता ज्याला आपण Lumpsum  इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा एक पद्धतशीर गुंतवणूक पद्धती निवडून त्यामध्ये पुढील 10 महिन्यांत प्रत्येक महिन्याला ₹1,000 ची गुंतवणूक करू शकता त्यालाच आपण SIP असे म्हणतो .

अशाप्रकारे आपण SIP व Lumpsum (difference between SIP and Lumpsum) मध्ये काय फरक आहे हे समजावून घेतले.

Lumpsum Investment plan
लेख शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top