Double Top and Double Bottom
Double Top and Double Bottom या दोन्ही पॅटर्नमध्ये Stock च्या सध्याच्या किमतीमध्ये उलटफेर होऊन पूर्वीच्या दिशेपेक्षा किंमत उलट दिशेने मार्गक्रमण करत असते.
हे रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचे चांगले उदाहरण आहे. हे चार्ट पॅटर्नचे तयार होण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे मोठ्या Timeframe मध्येच ते ओळखू येतात.
डबल टॉप चार्ट पॅटर्न हा इंग्रजी वर्णमालेतील M या अक्षरासारखा दसतो तर डबल बॉटम चार्ट पॅटर्न हा इंग्रजी वर्णमालेतील W या अक्षरासारखा दिसतो. दोन्ही चार्ट पॅटर्न एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात.
डबल टॉप पॅटर्न म्हणजे काय?
डबल टॉप पॅटर्न शेअरच्या मार्केटमध्ये मंदी दर्शवणारा एक रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे. ज्यामध्ये अपट्रेंडनंतर बाजारामध्ये येणाऱ्या मंदीचा ट्रेडर अंदाज लावत असतात. डबल टॉप पॅटर्न नेहमी किंमत वर चढत असताना जर सलग दोन वेळा वरच्या बाजूला अडथळा निर्माण होऊन किंमत खाली येत असेल तेंव्हा चार्टवर तयार होत असतो. त्यामध्ये सपोर्ट लेव्हलच्या जवळ नेकलाइन तयार होत असते.
डबल टॉप पॅटर्नच मध्ये किंमत पहिले शिखर तयार करताना मजबूत स्थितीत असते पण नंतरचे शिखर तयार करताना शेअर खरेदी करणाऱ्यांपेक्षा विक्री करणाऱ्यांची ताकद वाढत असल्यामुळे दुसरे शिखर कमजोर होऊन बाजार खालच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो.
जेव्हा किंमत दुसऱ्या शिखरावर गेल्यानंतर परत नेकलाइनवर (सपोर्ट लेव्हल जवळ) परत येते तेंव्हा हा पॅटर्न तयार झाल्याची खात्री होते.
जेव्हा शेअरची किंमत नेकलाइन किंवा सपोर्ट लेव्हलच्या खाली जायला सुरुवात करते तेंव्हा खर्या अर्थाने मंदीचा मंदीचा ट्रेंड सुरु होतो.
डबल टॉप चार्ट पॅटर्न विशेष
- डबल टॉप चार्ट पॅटर्न हा मंदीचा संकेत देणारा चार्ट पॅटर्न आहे.
- यामध्ये किंमत वरच्या बाजूला अडथळा निर्माण झाल्यामुळे खाली जाते.
- सपोर्ट लेव्हल तोडल्यानंतर किंमत अतिशय वेगाने मंदीच्या दिशेने प्रवास करते.
- मंदीच्या दिशेने ट्रेड करणाऱ्या ट्रेडरसाठी हा आवडीचा चार्ट पॅटर्न आहे.
हेही वाचा : Cup and Handle Pattern म्हणजे काय?
डबल बॉटम पॅटर्न म्हणजे काय?
डबल बॉटम चार्ट पॅटर्न हा एक तेजीचा संकेत देणारा रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे ज्याची निर्मिती बाजारामध्ये डाउनट्रेंड संपल्यानंतर होत असते. यामध्ये किंमत खालच्या बाजूला सपोर्ट लेव्हलपर्यत दोनवेळा जाते आणि दुसऱ्यावेळेस परत वर येताना मजबुतीने वर येते.
पाहिल्यावेळेस किंमत खाली जात असताना सपोर्ट लेव्हलवरून अडथळा निर्माण झाल्यामुळे वरच्या बाजूला फिरते पण विक्री करणाऱ्यांची ताकद कमी झाल्यामुळे परत किंमत खाली जाताना कमी दबाव निर्माण करते. त्यामुळे शेअर विकत घेणाऱ्यांची ताकद वाढून किंमत जोरात वर येते आणि पुन्हा बाजारामध्ये अपट्रेंड तयार होऊन किंमत वरच्या दिशेने मार्गक्रमण करते.
हेही वाचा : Head and Shoulders Pattern म्हणजे काय?
FAQ : नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Double top pattern bullish आहे का?
ट्रेडिंग मध्ये double top pattern हा bullish चार्ट पॅटर्न नसून तो रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे. त्यामध्ये बाजारामध्ये किंमत खालच्या बाजूने जात असून ते बाजारातील मंदीचे दर्शक आहे. शेअरची किंमत वरच्या पातळीवरून खालच्या दिशेने मार्गक्रमण करताना हा चार्ट पॅटर्न तयार होतो.
Double top pattern तयार झाल्यानंतर काय होते?
double top pattern तयार झाल्यानंतर बाजारामध्ये मंदी येऊन अपट्रेंड संपल्याची खात्री होत असते. हा चार्ट पॅटर्न रिव्हर्सल चार्ट पॅटर्नचा एक प्रकार आहे. त्यामध्ये बाजारामध्ये किंमत खालच्या बाजूने जात असून ते बाजारामध्ये मंदीचे वातावरण निर्माण करते.
Double top pattern मध्ये एन्ट्री केंव्हा घ्यायची?
double top pattern बनल्यानंतर जेंव्हा किंमत नेकलाईन जवळ येऊन सपोर्टला तोडत असेल तेंव्हा तुम्ही या पॅटर्नमध्ये आपली डाऊनट्रेंडच्या दिशेने एन्ट्री घेऊ शकता. पण जोपर्यंत किंमत सपोर्ट लेव्हल तोडत नाही तोपर्यंत ट्रेडमध्ये एन्ट्री घेण्याची घाई करू नये.