How to earn Rs 500 from the Stock Market daily ?

How to earn Rs 500 from the Stock Market daily
How to earn Rs 500 from the Stock Market daily?

शेअर बाजारातून दररोज ५०० रुपये कसे कमावता येतील?

शेअर बाजारात प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्याच्या आशेने येत असतो. शेअर बाजार हा सर्वात फायदेशीर पैसा कमावण्याचा मार्ग मानला जातो कारण तो इतर आर्थिक मार्गांपेक्षा चांगला परतावा return देतो. वर्षातील किमान २४० दिवस शेअर बाजार चालतो असे गृहीत धरल्यास दररोज 500 रुपये म्हणजेच वर्षाला शेअर बाजार मधून तुम्ही किमान 1,20,000 रुपयांची रक्कम कमवू शकता. पण हा मार्ग वाटतो तितका सोपा नाही परंतु अनुभव आणि योग्य नियोजन जर असेल तर आपण यामध्ये यशस्वी नक्कीच होऊ शकतो. चला तर बघूया की, शेअर बाजारातून रोज ५०० रुपये कसे कमावता येतील? How to earn Rs 500 from the Stock Market daily

1. कमी पण रोज नफा घ्यायला शिका | Take small but regular profits

शेअर बाजारातुन आपल्याला नियमित 500 रु किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर समाधानी वृत्ती ठेऊन सीमित नफा small profits घेऊन आपल्याला ट्रेड मधून बाहेर पडता यायला हवे. याचा अर्थ असा नाही कि एखाद्या ट्रेड मध्ये तुमचा प्रॉफीट होत आहे पण तुम्ही मध्येच बाहेर पडायचे. असे न करता ट्रेलिंग Stop Loss चा वापर करून विनिंग ट्रेड तुम्हाला ride करता आले पाहिजे. तरच आपण महिन्याच्या शेवटी एक प्रॉफीटेबल ट्रेडर सिद्ध होऊ शकू.

२. एकापेक्षा जास्त ट्रेड घ्या | Take Multiple Trades

एकाच ट्रेडमध्ये १०% किंवा १२% नफा मिळवण्याच्या भानगडीत न पडता छोटे-छोटे चार-पाच ट्रेड घेऊन प्रत्येक ट्रेडमध्ये किमान २ ते ३ % नफा मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. पण अतिप्रमाणात ट्रेड करण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. दिवसाला चार-पाच ट्रेड इन्ट्राडे मध्ये घेणे चूक नाही पण यापेक्षा जास्त म्हणजेच ३० ते ४० ट्रेड घेणे हे कधीही चुकीचे आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रोकरेज आणि tax जास्त लागून तुमचे नुकसान होऊ शकते.

३. News मधील stocks मध्ये ट्रेड करा | Trade stocks in news

सध्याच्या परिस्थितीमध्ये नेमक्या कोणत्या कंपनीच्या शेअर बद्दल बाजारामध्ये आणि बातम्यांमध्ये वारंवार चर्चा चालू आहे अशा stocks चा शोध घेऊन त्यांच्यामध्ये Intraday ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. कारण अशा शेअर्स मध्ये फार मोठ्या प्रमाणात Buy आणि Sell च्या ऑर्डर्स लागत असल्यामुळे त्या stocks मध्ये कमालीची volatility निर्माण होऊन त्याचा तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो.

How to earn Rs 500 from the Stock Market daily?

How to earn Rs 500 from the Stock Market daily

हेही वाचा : महिन्याचा पगार कुठे आणि कसा गुंतवायचा?

4. प्रमाणापेक्षा जास्त ट्रेड घेऊन नका | Don’t Overtrade

काही लोक मार्केट सुरु झाल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये प्रॉफीट मिळवतात पण अति हव्यासापोटी जास्त ट्रेड घेऊन मिळवलेला सर्व नफा पुन्हा गमावून बसतात. हे टाळण्यासाठी तुम्ही कमीत कमी पण दर्जेदार ट्रेड घायला शिकलं पाहिजे. जिथ ट्रेड घेत असताना जोखीम कमी पण नफा मिळण्याची शक्यता जास्त अशाच ट्रेड मध्ये तुम्ही तुमची एन्ट्री असली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला जास्त नफा मिळवता येईल आणि तुमचे जे ब्रोकरेज मध्ये विनाकारण पैसे वाया जाणार नाहीत.

5. Stop Loss चे नियम पाळा | Follow Stop Loss discipline

शेअर मार्केटमध्ये कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी आपल्याला या एका ट्रेड मधून किती नुकसान होऊ शकते याचा एक अंदाज घेऊन त्याठिकाणी आपला Stop Loss लावा. आणि एकवेळ Stop Loss लावल्यानंतर जो पर्यंत तुमचा Stop Loss हा हिट होत नाही किंवा जात नाही तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये बदल करण्याचे टाळले पाहिजे. हा एक जरी नियम तुम्ही पाळला तरी तुम्हाला रोज शेअर बाजारातून ५०० मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.

६. छोटे नुकसान आणि मोठा नफा | Take Small Loss Big Profit

शेअर मार्केट हे कधीही न बंद होणारे आर्थिक चक्र आहे. या चक्रामध्ये जर तुम्हाला टिकायचे असेल तर “छोटे नुकसान आणि मोठा नफा” हे सूत्र तुम्हाला पाळता आले पाहिजे. कोणताही ट्रेड घेत असताना त्यामधून आपण आपल्या एकूण रकमेवर (कॅपिटलवर) किती रिस्क घेत आहोत याचा ताळेबंद आधीच लावला पाहिजे. जर तुमचे एकूण कॅपिटल १००००० रु (एक लाख रु) असेल आणि एका ट्रेड मध्ये जर तुम्ही २०००० रुपयांची रिस्क घेत असाल तर हे नक्कीच चुकीचे आहे. तुम्ही या ठिकाणी एका ट्रेडमागे जास्तीत जास्त १००० रुपयांची रिस्क घ्यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त नको. कारण जर तुमचे एका-पाठोपाठ पाच ट्रेडमध्ये जरी नुकसान झाले तर १००० रु प्रती ट्रेड याप्रमाणे फक्त ५००० रुपयांचे नुकसान होईल पण जर प्रत्येक ट्रेड मध्ये २०००० रुपयांची रिस्क घेऊन काम केले तर पाच ट्रेड मध्येच तुमचे संपूर्ण कॅपिटल संपून जाईल. त्यामुळे नेहमी “छोटे नुकसान आणि मोठा नफा” हे सूत्र तुम्ही लक्षात ठेऊनच काम करायला हवे आहे.

सारांश | Conclusion

शेवटी शेअर बाजार हा सर्वोच्च आहे आणि हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जर एखादा ट्रेड चुकला तर जास्त इमोशनल होऊन निराश न होता त्यादिवशी ट्रेडिंग बंद करून स्वतःला आणि कुटुंबाला तुम्ही वेळ दिला पाहिजे म्हणजे उद्या पुन्हा नव्या उर्जेने तुम्हाला बाजाराला सामोरे जाता येईल.

लेख शेअर करा.

image credit : flaticon

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top