भविष्यासाठी पैसे कसे वाचवावे? | how to save money for future?

भविष्यासाठी पैसे कसे वाचवावे?

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या अनावश्यक खर्चाच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हि काळाची गरज असून त्याचे पालन तुम्ही केले पाहिजे. मग पैशांच्या बचतीचे मार्ग कोणते-कोणते आहेत याबद्दल आपण या लेखामध्ये चर्चा करणार आहोत. भविष्यासाठी पैसे कसे वाचवावे? (how to save money for future?) या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल

१. गरज असेल तेंव्हाच कर्ज घ्या

आजकालच्या जाहिरातींच्या युगामध्ये तुमच्यावर सर्व बाजूने जाहिरातींचा मारा करून कंपन्या त्यांचे Products विकत घ्यायला तुम्हाला भाग पडतात. अशा चैनीच्या आणि गरज नसलेल्या वस्तूंसाठी आपण कर्ज काढणे टाळले पाहिजे. अमुक एखाद्या नातेवाईकाने नवीन घर बांधले, गाडी घेतली म्हणून तुम्हीसुद्धा गरज नसताना तसे करणे मूर्खपणाचे लक्षण आहे.

या गोष्टींसाठी काढलेले कर्ज फेडताना तुमच्यावर मानसिक तान निर्माण होऊन त्याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक स्वास्थ्यावर होत असतो म्हणून विनाकारण कटकटी वाढवून घेऊ नका, खरच गरज असेल तेंव्हाच कर्ज काढा.

2. ३० दिवसांचा बचत नियम काय आहे?

“ जर तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर लगेच ती विकत न घेता ३० दिवस थांबून नंतर विकत घ्या, म्हणजे त्या वस्तूची खरच तुम्हाला गरज आहे किंवा नाही हे तुम्हाला कळेल.” यालाच ३० दिवसांचा बचत नियम असे म्हणतात. याचा खूप फायदा तुम्हाला आर्थिक नियोजन काटकसरीने पाळताना होऊ शकतो.

कारण निर्णय घेण्यासाठी तुमच्याजवळ ३० दिवसांचा कालावधी असल्यामुळे तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे गरज असलेल्या वस्तूवरच तुमचा अमुल्य पैसा खर्च होऊन पैशांची बचत होते.

how to save money for future?

Where To Invest Your Monthly Salary

3. 50-30-20 बचत नियम म्हणजे काय?

“ तुमच्या उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम अत्यावश्यक गरजांवर, ३० टक्के रक्कम रोजच्या कामांसाठी, २० टक्के रक्कम बचत, गुंतवणूक करण्यासाठी वापरणे यालाच ५० ३० २० चा बचत नियम असे म्हणतात.”  

या नियमाचा वापर करून तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन योग्यरीतीने करू शकता. अत्यावश्यक बाबींसाठी खर्च केल्यानंतर आपल्या दैनंदिन गरजांवर खर्च करावा. उरलेल्या पैशांची गुंतवणूक करण्यावर तुमचा भर असायला हवा.

४. पैसे बचत करण्याचे ध्येय ठरवा

समजा तुम्हाला पुढील सहा महिन्यात एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, त्यासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी वेळेवर धावपळ न करता आजपासूनच नियोजन करा. एक ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे साठवायचे आहेत यावर लक्ष द्या आणि त्यात खंड पडू देऊ नका.

अत्यंत प्रामाणिक राहून छोटे-छोटे लक्ष निर्धारित करून केलेली बचत भविष्यात तुम्हाला चांगला फायदा करून देऊ शकते.

५. क्रेडीट कार्डचा अतिवापर टाळा

रोज तुमच्यासमोर दोन-चार वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडीट कार्डचे मेसेज मोबाईलवर येतात. मग तुम्ही गरज नसताना क्रेडीट कार्ड घेऊन त्याचा वापर तुमच्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी करता. अशा केलेल्या खर्चामुळे तुमचे आर्थिक नियोजन पूर्णपणे बिघडू शकते कारण एकदिवस तुम्ही वापरलेल्या क्रेडीट कार्डचे बिल तुम्हाला भरावेच लागणार आहे.

म्हणून जाहिरातींना बळी पडू नका आणि अनावश्यक खर्च टाळा.

६. गरज आणि आवश्यकता यातील फरक ठरवा

गरज आणि आवश्यकता यातील फरक जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येतील तेवढे चांगले. जे काम मोटारसायकल वापरून होऊ शकते त्या कामासाठी चारचाकी गाडी घराबाहेर काढण्याची गरज काय? म्हणजेच तुमची गरज आणि आवश्यकता यात तुम्हाला फरक करता आला पाहिजे.

कारण गरज नसताना केलेला खर्च हा तुम्हाला ,मानसिक रित्या कमजोर करतो आणि नंतर तुम्ही पश्चाताप करून काही उपयोग होत नाही.  

७. व्यसनापासून दूर राहा

क्षणिक सुखासाठी व्यसन करून तुमचे भविष्य खराब करू नका. व्यसनाचा वाईट परिणाम फक्त तुमच्यावर होत नसून तुमच्या पूर्ण परिवारावर होतो. तुम्ही आधी व्यसन करण्यासाठी खर्च करता आणि मग त्यातून आरोग्य खराब झाल्यावर ते सुधारण्यासाठी पुन्हा खर्च करता.

हि खर्चाची प्रक्रिया निरंतर गोल-गोल चक्राप्रमाणे सुरूच राहते. त्यामुळे शक्य होईल तेवढे व्यसनापासून दूर राहा.

how to save money for future?

how to save money for future?

हेही वाचा : महिन्याचा पगार कुठे गुंतवावा?

८. खर्चाचा आढावा घेत राहा

तुम्ही किती पैसे कमवता, किती खर्च करता, किती बचत करता याचा आढावा तुम्ही नियमित घेतला पाहिजे. नाहीतर “कमवतो १०० रुपये आणि खर्च ९० रुपये, मग बचत काय करणार फक्त १० रुपये.” असे न करता आपली कमाई आणि आपला खर्च याचा ताळमेळ आपण सतत ठेवला पाहिजे. कमाईच्या तुलनेतच तुमचा खर्च असला पाहिजे.

९. Sip सुरु करा

आजच्या महागाई मध्ये उत्पन्नाच्या एकाच साधनावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे. त्यासाठी तुम्ही बचत केलेला पैसा SIP च्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केटमध्ये, म्युचुअल फंड मध्ये गुंतवून त्या पैशाला अधिक वाढवू शकता. आज पैशाची गुंतवणूक करण्यासाठी सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त थोड डोक वापरून योग्य SIP मध्ये पैसे गुंतवावे लागतील.

१०. Bonds मध्ये गुंतवणूक करा.

बँकेमध्ये पैसे ठेवणे हा आजच्या काळामध्ये बचत करण्याचा मार्ग नाही, तर तुम्ही बचत केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवून त्या पैशातून आणखी पैसे कमावणे हे उत्तम आर्थिक नियोजनाचे लक्षण आहे.

त्यासाठी तुम्ही Bonds मध्ये गुंतवणूक करून चांगला हमखास परतावा मिळवू शकता. कारण बँकेच्या व्याजदरापेक्षा Bonds मध्ये चांगले Return मिळतात. सोबतच Bonds मध्ये केलेली गुंतवणूक इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीपेक्षा कमी धोक्याची असते.

११. वापरात न येणारे Subscriptions बंद करा

फक्त दिखाव्यासाठी आपण कधीकधी आपल्याला गरज नसलेले Subscriptions घेतो आणि नंतर त्याचे बिल भरत बसतो. TV CHANNEL, NETFLIX, YOUTUBE, GAME असे subscriptions तुम्ही काम संपल्यानंतर ताबडतोब बंद करा. अनावश्यक खर्चाला आळा घालण्याचा हा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला बचतीची चांगली सवय घालून देतो.

१२. अनावश्यक वस्तू विकून टाका

एखाद्या कामासाठी घेतलेली वस्तू ते काम पूर्ण झाल्यानंतर जर तुम्हाला त्याची भविष्यात गरज पडत नसेल तर विनाकारण घरात ठेवण्यापेक्षा ताबडतोब विकून टाका. कारण वेळ निघून गेल्यानंतर अशा वस्तूंची बाजारातील किंमत कमी-कमी होत जाते. त्यामुळे त्या विकून त्यातून मिळणारे पैसे तुम्ही चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये किंवा म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.

अशाप्रकारे आपण भविष्यासाठी पैसे कसे वाचवावे? (how to save money for future?) या प्रश्नाचे उत्तर याठिकाणी जाणून घेतले. आणि भविष्यातील बचतीचे नियम काय आहेत याची माहिती करून घेतली.


लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top