How to Select Best Mutual Funds in India?

How to Select Best Mutual Funds?

mutual fund मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणुकीत सुरक्षितता, चांगले व्यवस्थापन, उत्तम सुविधा देणाऱ्या आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देणाऱ्या म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

भारतातील सर्वोत्तम म्युच्युअल फंडाची Best Mutual Funds in India निवड करताना करताना कोणत्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने बघितल्या पाहिजे हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

1. Register fund houses

भारतीय शेअर बाजारातील सर्व म्युच्युअल फंड हाऊसेस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिपत्याखाली काम करत असतात.

त्यासोबतच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) म्युचुअल फंड व्यवस्थापक यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे तुमची म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक सुरक्षित असते. म्हणून म्युच्युअल फंड व्यवस्थापक निवडताना ते नोंदणीकृत आहे किंवा नाही हे बघणे गरजेचे आहे.

2. Check the fund’s track record

फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा – मागील तीन आणि पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. गतकाळातील उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे सर्वात सुरक्षित समजल्या जाते.

कारण mutual fund निवडताना या फंडांच्या कामगिरीने त्यांच्या बेंचमार्क आणि पीअर फंडांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली असणे आवश्यक आहे. तुम्ही त्यासाठी मागील काही वर्षातील फंडाच्या कामगिरीचे तुम्ही विश्लेषण केले पाहिजे.

सतत चांगला परतावा देणारा फंड शेअर बाजार कोणत्याही दिशेला गेला तरी चांगलाच परतावा Return तुम्हाला मिळून देतो. सोबतच शेअर बाजार खाली पडत असताना म्युचुअल फंडाची कामगिरी तपासा कारण टॉप परफॉर्मिंग फंडाच्या कामगिरीवर बाजारातील हालचालींचा फारसा परिणाम होत नसतो.

3. Returns and risk ratios

गुंतवणूक करताना परतावा आणि जोखीम यांचे गुणोत्तर तपासा. म्युचुअल फंडामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही सर्वात आधी या फंडामध्ये तुम्हाला किती जोखीम पत्करावी लागणार आहे आणि त्या जोखीमेवर तुम्हाला किती परतावा Return मिळणार आहे याचे गुणोत्तर आधी तपासले पाहिजे.

कारण कधीकधी परतावा कमी पण जोखीम जास्त असे होऊन तुम्ही केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला फायदा मिळवून देऊ शकत नाही. जिथे परतावा कमी आणि जोखीम जास्त अशा म्युचुअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करण्याचे टाळले पाहिजे.

Best Mutual Funds

best mutual funds in india

4. Expense ratio of mutual fund

गुंतवणूक करण्यासाठी mutual fund योजना निवडताना एक्सपेन्स रेशो तपासणे खूप आवश्यक आहे. “एक्सपेन्स रेशो म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला हाताळण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यासाठी फंड हाऊसद्वारे आकारले जाणारे शुल्क होय.”

हे शुल्क फंडाच्या परताव्याच्या टक्केवारीनुसार व्यक्त केले जाते आणि गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या परताव्यातून ते वजा केले जाते.  जर तुमचे फंड व्यवस्थापक जास्त शुल्क आकारात असतील तर त्यामुळे तुमचे खर्चाचे प्रमाण वाढून तुमचा टेक-होम परतावा कमी होतो.

फंड हाऊसेस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त शुल्क आकारू शकत नाहीत.

तुमच्या पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीत वारंवार फेरबदल केल्याने तुमचा गुंतवणुकीचा खर्च (खर्च गुणोत्तर) वाढतो कारण जास्त फेरबदल केल्यामुळे तुमच्या व्यवहारांची संख्या वाढून फंड मॅनेजर तुम्हाला जास्त शुल्क आकारतात.

समान कामगिरी आणि समान परतावा देणाऱ्या फंडामधून तुम्ही सर्वात कमी खर्च गुणोत्तर असलेला फंड गुंतवणुकीसाठी निवडा. त्यामुळे तुमची बचत होईल.

हेही वाचा : इंडेक्स फंड म्हणजे काय?

5. History of mutual fund

बाजार वाईट अवस्थेत असताना म्युचुअल फंड व्यवस्थापकांनी कशाप्रकारे व्यवस्थापन केले हे बघणे गरजेचे आहे. त्यावरून त्या फंड व्याव्थापाकाची गुणवत्ता सिद्ध होत असते.

तसेच मागील तीन ते पाच वर्षामध्ये त्या म्युचुअल फंडाने किती परतावा त्यांच्या गुंतवणूकदारांना मिळवून दिला हे लक्षात घेतले पाहिजे. म्युचुअल फंडाचा जेवढा चांगला इतिहास असेल तेवढाच म्युचुअल फंडाच्या भविष्याबद्दल दृढ विश्वास निर्माण होत असतो.

मागील इतिहासामध्ये चांगली कामगिरी करणारे म्युचुअल फंड तुम्हाला भविष्यात चांगली कामगिरी करून दाखवतील याची शक्यता नवीन म्युचुअल फंडापेक्षा अधिक असते. म्युचुअल फंड व्यवस्थापक जेवढे जास्त अनुभवी असतील तेवढीच त्यांचे निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते.

6. Performance of Fund manager

गुंतवणूक करताना तुम्ही निवडलेल्या फंड व्यवस्थापकाचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असणे आवश्यक आहे. कोणत्याही फंडाच्या यशामध्ये फंड मॅनेजरची भूमिका महत्त्वपूर्ण असते. फंड व्यवस्थापकाचे कौशल्य आणि निर्णय क्षमता तुमची गुंतवणूक अधिक सुरक्षित करते.

फंड व्यवस्थापक जेवढा कौशल्यपूर्ण असेल तेवढा गुंतवणूकदारांचा परतावा वाढत असतो. फंड व्यवस्थापकाची चांगली कामगिरी तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करत असते.

7. Redeem at any time

शेअर बाजारात आजरोजी उपलब्ध असलेल्या म्युचुअल फंड योजनांपैकी बहुतेक म्युच्युअल फंड योजना ओपन एंडेड असतात. त्यामुळे गुंतवणूकदार त्यांचे म्युच्युअल फंड युनिट कधीही रिडीम करून त्यांचे पैसे परत मिळवू शकतात.

या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत नेहमीच तरलता मिळते आणि त्रास-मुक्त पद्धतीने पैसे काढण्याचा लाभ मिळतो.

8. Option to invest small amounts

नियमितपणे लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. कारण म्युच्युअल फंड व्यवस्थापक जर तुम्हाला असे करण्यास परवानगी देत नसेल तर अशा फंडामध्ये गुंतवणूक करू नका.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे एसआयपी किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. SIP द्वारे, तुम्ही नियमितपणे 100 रुपये इतकी कमी रक्कम गुंतवू शकता. यामुळे तुमचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज पडत नाही.


लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top