Pump and Dump of Share म्हणजे काय?

शेअर मार्केटमध्ये “जेंव्हा फसवणूक करणारे लोक एखाद्या कंपनीबद्दल चुकीची माहिती पसरवून त्या कंपनीच्या शेअरची किंमत एकदम वाढवतात आणि नंतर लगेच त्यांचे शेअर वाढत्या किंमतीला विकून शेअरची किंमत पाडतात यालाच Pump And Dump Of Share असे म्हणतात.”

अशावेळी साधारण गुंतवणूकदार आमिषाला बळी पडून अशा कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतात आणि नंतर आपले नुकसान करून बाहेर पडतात.

Pump And Dump of Share मध्ये फसवणूक करणारे लोक social media, investment research websites, investment newsletters, online advertisements, email, direct mail, newspapers, radio च्या माध्यमातून एखाद्या अमुक कंपनीच्या शेअरची किंमत आता वाढणार आहे अशी चुकीची माहिती सर्वीकडे पसरवून लोकांना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित केल्या करतात.

भोळे-भाबडे, नवशिके गुंतवणूकदार अशा भूलथापांना बळी पडून कोणताही विचार न करता शेअर्समध्ये पैसे गुंतवतात आणि नुकसान झाल्यावर शेअर मार्केटला दोष देऊन मार्केटमधून बाहेर पडतात.

तुम्हाला जर अशा भूलथापांना बळी पडायचे नसेल तर अशा फसवणूक करणाऱ्या जाहिरातींपासून दूर राहता आले पाहिजे त्यासाठी आपण या लेखामध्ये Pump And Dump Of Share पासून कसे वाचता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत.

Pump and Dump of share in detail

Pump And Dump of share कसे काम करते?

१. हजारो email आणि SMS तुमच्यापर्यंत पोहचवले जातात.

२. ऑनलाईन Webinars घेऊन तसेच खास याच कामासाठी YouTube channels बनवून त्यातून तुम्हाला खोटी माहिती पुरवली जाते.

३. Twitter, WhatsApp, Telegram च्या माध्यमातून सातत्याने तुमच्यासमोर त्या कंपनीच्या गुंतवणुकीसाठी फसव्या जाहिराती चालवल्या जातात.

४. खोटे सल्लागार तुम्हाला या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी खोटे Reports दाखवतात.

५. तुमच्या गुंतवणूक केलेल्या पैशावर high investment returns तुम्हाला मिळवून देण्याचे सांगितले जाते.

६. गुंतवणुकीची संधी “फार कमी कालावधीसाठी” उपलब्ध आहे असे वारंवार तुमच्यापर्यंत मुद्दाम पोहचवले जाते.

Pump And Dump of Share पासून कसे दूर राहावे?

या फसव्या गुंतवणुकीपासून तुम्हाला कसे दूर राहता येईल यासाठी खालील गोष्टींवर तुमचे लक्ष असायला हवे.

1. fundamentals of the Company

हुशार आणि समजदार गुंतवणूकदार कोणत्याही कंपनीमध्ये त्यांचा पैसा गुंतवताना ती कंपनी किती मजबूत आहे?, तिला बाजारामध्ये येऊन किती वर्ष झाली?, बाजारातील त्या कंपनीचे सध्याचे स्थान काय आहे? अशा विविध मार्गांचा वापर करून गुंतवणूक करण्यासाठी कंपनीची निवड करत असतात.

जर कंपनी त्यांच्या नियमावली मध्ये बसत नसेल तर अशा कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याचे टाळतात. हाच नियम तुम्हीसुद्धा वापरला पाहिजे जेणेकरून तुम्ही फसव्या जाहिरातींना बळी पडणार नाही.

2. Price Movement of Share

कंपनीच्या शेअरची किंमत कोणत्या पद्धतीने बदलेते यावर तुमचे लक्ष असायला पाहिजे. जर एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत कोणतेही कारण नसताना फक्त बाजारात पसरवलेल्या बातम्यांमुळे वाढत असेल तर हि एक प्रकारे धोक्याची घंटा आहे.

कंपनीने कोणताही नफा कमावला नाही, कोणतीही नवीन सुधारणा नाही, कोणतेही नवीन प्रोजेक्ट नाहीत तरीही कंपनीच्या शेअर्सची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे हि बाब संशयास्पद आहे अशा कंपनीपासून तुम्ही लांब राहायला हवे.

शेअर्सच्या Pump And Dump मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत एकदम अवाजवी वाढून त्यामुळे शेअरच्या चार्टवर ९० डिग्रीच्या कोणामध्ये किंमत वर जाताना दिसते.

Pump and Dump of share in marathi

३. Shareholding Pattern of Stock

कोणत्याही कंपनीच्या शेअर्स मध्ये त्या कंपनीच्या मालकांची किती प्रमाणात हिस्सेदारी आहे हे महत्वाचे असते. कारण जर कंपनीच्या मालकांची किंवा व्यवस्थापक मंडळींची कंपनीमधील हिस्सेदारी दिवसेंदिवस कमी होत आहे पण तरीही शेअर्सची किंमत वाढत आहे हे गुणोत्तर बरोबर नाही.

अशा परिस्थितीत तुम्ही गुंतवलेला पैसा बुडण्याची शक्यता जास्त असते. कारण ज्या अर्थी कंपनीमध्ये मालकांची हिस्सेदारी कमी होत जाते म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांना या कंपनीच्या भविष्यातील वाढीबद्दल शंका आहे असे स्पष्ट होते. अशावेळी तुम्ही केलेली गुंतवणूक मूर्खपणाची ठरू शकते.

४. Company Business करते कि नाही?

कंपनीच्या शेअर्सची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे पण कंपनीच्या बिसनेस मध्ये त्याचप्रमाणात तोटा वाढत आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आधीच सावधान होणे गरजेचे आहे. जर कंपनीचा व्यवसाय तोट्यात असेल तर त्या कंपनीचे भविष्य अंधारात आहे असे स्पष्ट होते.

अशा “लंगड्या घोड्यावर” तुम्ही तुमचे कष्टाने कमावलेले पैसे लावणार का? याचा विचार तुम्ही करायला हवा. तोटा वाढतोय पण शेअर्सची किंमत कमी होत नाही म्हणजेच तुमची गुंतवणूक फसण्याची शक्यता १०० टक्के आहे.हेही वाचा :

हेही वाचा : Bonds म्हणजे काय?

५. जाहिरातींना बळी पडू नका.

आज कंपनीला जाहिरात करण्यासाठी खुप साधने उपलब्ध आहेत. अशा साधनांचा वापर करून फसवणूक करणारे लोक तुम्हाला वेगवेगळी आमिष दाखवतात. अशावेळी तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

फसव्या जाहिरातींमधून कमी वेळामध्ये तुम्ही कसे श्रींमंत होऊ शकता हे तुम्हाला दाखवले जाते. त्यासाठी विविध फसवे वायदे केले जातात, चुकीचे profit screenshot तुम्हाला दाखवले जातात.

त्यांना बळी पडून तुम्ही कोणताही अभ्यास न करता त्या कंपनीची कोणतीही माहिती न घेता कुणीतरी सांगतोय म्हणून त्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवता आणि एक दिवस पश्चाताप करून सरळ मार्केट मधूनच बाहेर पडता.


लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top