Stock Selection For Swing Trading | स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसे निवडावे?

Stock Selection For Swing Trading in marathi

स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसे निवडावे?

सर्वात जुना आणि खात्रीशीर ट्रेडिंगचा प्रकार म्हणून स्विंग ट्रेडिंग ओळखल्या जाते. स्विंग ट्रेडिंगमध्ये ट्रेड घेताना ट्रेडर आपली पोझिशन काही दिवस, काही आठवडे, काही महिने रोखून ठेऊन जास्तीत जास्त लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. (Stock Selection For Swing Trading) तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मध्ये कशाप्रकारे stock निवड करायची आहे याबाबद्चीद्ल माहिती असणे आवश्यक आहे. Intraday ट्रेडिंगपेक्षा स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात लाभ मिळवता येऊ शकतो.

कारण तुम्ही छोटा नफा profit घेऊन बाहेर न पडता जास्त नफा मिळवण्यासाठी थांबू शकता. पण स्विंग ट्रेडिंग मध्ये स्टॉकची निवड करताना काही बाबी विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे, (Stock Selection For Swing Trading) त्यातीलच महत्वाच्या बाबींची आपण खाली चर्चा करणार आहोत.

1. Stock On Breakouts

स्विंग ट्रेडिंगसाठी Stock ची निवड करताना त्या Stock मध्ये सध्या कोणत्या बाजूने ब्रेकआउट होत आहे हे तुम्ही बघितले पाहिजे. जर समजा त्या Stock मध्ये वरच्या बाजूला ब्रेकआउट येत असेल तर नक्कीच तो Stock uptrend मध्ये आहे अस आपण म्हणून शकतो.

Stock च्या डायरेक्शन नुसारच आपला ट्रेड असायला हवा. ब्रेकआउट झाल्यावर व्हॉल्यूम वाढत असतो.

2. Volume in Stock

स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉकमध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला तुमचे Buy आणि Sell चे ऑर्डर लावायचे असतील तर त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम असणे आवश्यक आहे. स्टॉकमध्ये कुणी खरेदी घेणार आणि विकणार जर नसेल तर तुमचे ट्रेड फसण्याचे प्रमाण वाढू शकते.

म्हणून पेनी स्टॉक मध्ये कधीही ट्रेड करू नये कारण स्टॉकमध्ये व्हॉल्यूम अजिबात नसतो. तुमचे ऑर्डर न लागल्यामुळे तुमची पोझिशन तशीच अडकून पडते आणि त्यामुळे तुम्हाला लॉस सुद्धा होऊ शकतो. स्टॉकमधील व्हॉल्यूमचे ओळखण्यासाठी तुम्ही व्हॉल्यूम इंडिकेटर देखील वापरू शकता.

Stock Selection For Swing Trading

Stock Selection For Swing Trading

3. Liquidity in Stock

स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉकची निवड करताना सर्वात आधी तो स्टॉक लिक्विड आहे किंवा नाही हे बघावे. स्टॉक लिक्विड असणे म्हणजे त्या स्टॉकची किंमत हि बदलणारी असायला हवी. कारण स्विंग ट्रेडिंगमध्ये जर स्टॉकची किंमत वाढली किंवा घटली नाही तर तुमचे पैसे त्यामध्ये अडकून पडतील आणि कोणताच फायदा होणार नाही.

स्टॉक लिक्विड होण्यासाठी त्या स्टॉकमध्ये दिवसाला किमान पाच ते दहा लाख शेअर्सची खरेदी विक्री व्हायला हवी. स्टॉक लिक्विड नसेल तर तुम्हाला एखाद्या ट्रेड मध्ये तोड होत असताना सुद्धा त्यातून बाहेर पडता येणार नाही.

4. Relative Strength of Stock

स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक्स निवडताना ते स्टॉक्स त्या सेक्टरमध्ये इतर स्टॉक्सच्या तुलनेत अधिक मजबूत असायला हवे. कारण स्टॉक्सच्या किंमतीमधील अति चढ-उतार हा स्विंग ट्रेडिंग मध्ये हानिकारक मानल्या जातो.

तुम्ही स्टॉक्स निवडताना तो किती मजबूत आहे आणि त्याची किंमत किती स्थिर प्रमाणात वाढते याचे अवलोकन करून स्टॉक्सची निवड करायला हवी.

5. Volatility In Stock

स्टॉक किती अस्थिर volatile आहे हे मोजण्यासाठी सामान्यपणे ट्रेडिंग मध्ये बॉलिंगर बँड किंवा ATR सारख्या volatility Indicator चा वापर ट्रेडर करताना आपल्याला दिसतात. स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडताना तो किती volatile आहे हे बघणे महत्वाचे आहे.

एखादा Stock खूप जास्त volatile असतो अशा stock ची किंमत अस्थिर राहून सतत बदलत असते, अशावेळी त्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंगपेक्षा intraday ट्रेडिंग चांगली करता येते

हेही वाचा : स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?

6. Market direction

खूप मेहनत आणि अभ्यास करून आपण चांगला मजबूत पाया असलेला स्टॉक निवडला आणि त्यात स्विंग ट्रेडिंग करण्याचे ठरवले. पण हे करण्यापूर्वी सध्या शेअर बाजार कोणत्या दिशेने जात आहे हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.

नाहीतर शेअर बाजार खालच्या बाजूला जात आहे आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध दिशेने जर ट्रेड घेत असाल तर तुमचा अभ्यास या ठिकाणी कामात येणार नाही. म्हणून मार्केटच्या वाढण्याच्या दिशेनेच तुम्ही स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे.

Stock Selection For Swing Trading

swing trading market directin

7. Direction bias

Direction bias म्हणजे पूर्वग्रह दूषित दृष्टी होय. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास तुम्ही ट्रेड घेण्यापूर्वी मार्केट सध्या कोणत्या बाजूला वाटचाल करत आहे हे न बघता “ मला अस वाटते मार्केट आता वर जाईल” असे आधीच मनामध्ये गृहीत धरून मार्केटची दिशा आपल्या मनाप्रमाणे ठरवत असता यालाच Direction bias असे म्हणतात.

म्हणून कधीही असे पूर्वग्रह न करता वास्तविक मार्केटची दिशा काय आहे त्यानुसारच तुमचे ट्रेड प्लान असायला हवे. उगाच तुम्हाला वाटते म्हणून कोणतेही फालतू ट्रेड घेऊ नका.

8. Repetitive trading pattern

कधी कधी एखाद्या स्टॉकच्या चार्टमध्ये तुम्हाला वारंवार एकाच प्रकारचे Chart pattern दिसून येतात. अशावेळी मागच्या चालीप्रमाणे याहीवेळी स्टॉक तशीच चाल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे चार्ट वरील वारंवार येणारे Repetitive trading pattern ओळखून त्यानुसार तुम्ही तुमचे स्विंग ट्रेड करायला हवे.

पण असे करताना तो stock मागच्या प्रमाणेच पुढे सुद्धा आपली चाल करेल असे खात्रीशीर सांगता येत नाही.

9. Clear uptrend

जेंव्हा सरकारचा बजेट जाहीर होणार असतो किंवा एखादी घटना अशी घडते जेंव्हा शेअर बाजारामध्ये तेजी निर्माण होऊन एक Clear uptrend तयार होतो. अशावेळी जवळपास सर्वच कंपनीच्या शेअरची किंमत वाढत जाते. अशावेळी Clear uptrend ओळखून त्यानुसार तुमचे ट्रेडिंग प्लान तयार असायला हवे.

या संधीचा जेवढा जास्तीत-जास्त फायदा तुम्हाला घेता येईल याकडे तुमचे लक्ष असायला हवे.

अशाप्रकारे आपण Stock Selection For Swing Trading याबाबत वरील लेखामध्ये माहिती जाणून घेतली.


लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top