What are bonds? | बाँड्स म्हणजे काय?

बाँड्स म्हणजे काय?

What are bonds? – जेंव्हा एखाद्या कंपनीला, संस्थेला किंवा सरकारला त्यांच्या कामांसाठी निधी उभारायचा असतो तेंव्हा बँकेतून कर्ज न घेता अशा संस्था त्यांचे बाँड Investment Securities जारी करतात आणि या बाँडच्या बदल्यात गुंतवणूकदार यांचेकडून पैसा घेतात. प्रत्येक बाँडचा विशिष्ट कालावधी असतो तो संपल्यानंतर कंपनी किंवा बाँड जारी करणारी संस्था गुंतवणूकदार यांना त्यांची मुद्दल + व्याज अशी एकूण रक्कम परत करते.

प्रत्येक बाँडची एक विशिष्ट मॅच्युरिटी तारीख असते आणि ती पूर्ण झाल्यावर, बाँड जारी करणारी संस्था गुंतवणूकदाराला नफ्याच्या काही भागासह त्याची गुंतवणूक केलेली रक्कम परत करत असते.

बाँड्सची वैशिष्टे काय आहेत?

बाँड्स हे गुंतवणूकदार यांचेसाठी एक सुरक्षित आणि निश्चित-उत्पन्न देणारे गुंतवणुकीचे साधन आहे.

गरजेच्यावेळी बँकेमधून कर्ज न घेता कंपनी, सरकार किंवा सरकारी संस्था यांचेसाठी त्यांचे बाँड विकणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

बाँड ही एकप्रकारे कर्जाची एक पद्धत आहे, जी कर्जदार एका विशिष्ट कालावधीसाठी वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून घेतात.

बाँड म्हणजे गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यातील एक करार आहे, ज्यामध्ये कर्जदार संस्था त्यांच्या विविध कामासाठी पैसे वापरतात आणि बाँड गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीवर व्याज आकर्षक व्याज देतात.

जवळपास सर्वच कंपन्या, सरकारे, नगरपालिका आणि इतर संस्था कर्ज उभारणीसाठी बाँडचा वापर करतात. यामधून संकलित केलेल्या निधीचा वापर कंपन्या त्यांचा व्यवसाय व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरतात.

What are bonds? याची माहिती आपण समजून घेतली आता सरकार bonds कशासाठी जारी करते ते बघूया.

what are bonds?

सरकार बाँड कशासाठी जारी करते?

निवडणुकीमध्ये जनतेला केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यसाठी सरकारला निधीची आवशकता असते. सरकारला देशामध्ये किंवा राज्यात रस्ते, दवाखाने, शाळा आणि इतर पायाभूत प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी निधीची आवशकता असते.

त्यासाठी सरकार अंतराष्ट्रीय पातळीवरून कर्ज न घेता त्यांच्या संस्थांचे बाँड bonds विकायला काढते. सरकारी बाँड असल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित वातावरणात न भिता गुंतवणूक करून सरकारला हवा तेवढा निधी उभा करण्यास मदत करते.

आंतराष्ट्रीय पातळीवरून कर्ज घेतल्याने सरकारची प्रतिमा जनतेत खराब होण्याची भीती असते हे टाळण्यासाठी सुद्धा सरकार आपल्या संस्थांचे बाँड्स विकायला काढतात.

बाँड्स विकल्यामुळे सरकार आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये एक करार होतो आणि या कराराचा परतावा व्याजासह मिळाल्यामुळे सरकारची बाजारातील पत वाढून त्याचा फायदा सरकारला निधी उभा करण्यासाठी होतो.

मोठ्या कंपन्यांना बँक एकरकमी जेवढे कर्ज देऊ शकते त्यापेक्षा कितीतरी जास्त पैशांची गरज बॉण्ड्स जारी केल्याने पूर्ण होते.

बॉण्ड्स मध्ये गुंतवणुकीचे फायदे

१. सुरक्षित गुंतवणूक

सरकार किंवा सरकारी कंपन्या, संस्था bonds जारी करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये केलेली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानल्या जाते. एकवेळ कंपनी बुडेल पण सरकार बुडाल्याच्या घटना फार विरळ असतात.

म्हणून सरकारी बाँड मध्ये केलेली गुंतवणूक इतर ठिकाणच्या तुलनेत सुरक्षित असते.

२. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन

गुंतवणूक करताना तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये डायव्हर्सिफिकेशन असणे आवश्यक आहे. त्यामळे तुम्हाला कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करता येते. शिवाय निश्चित परतावा मिळण्याची हमी सुद्धा असते. एखाद्या वेळेस शेअर बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूकदारांसाठी त्यांचे भांडवल टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये बॉण्ड्सचा समावेश असतो.

३. कमी जोखीम

सरकार, सरकारी कंपनी, संस्था किंवा मोठ-मोठ्या कंपनीच्या बॉण्ड्स मध्ये केलेली गुंतवणूक हि कमी जोखीम निर्माण करणारी असते. निश्चित आणि ठराविक कालांतराने हमखास नफा मिळवून देण्यासाठी बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करणे सोयीचे असते.

४. गुंतवणुकीवर हमखास Returns

जवळपास सर्वच बाँड्स ठराविक अंतराने गुंतवणुकीवर व्याज देतात आणि जेव्हा बाँड्स ची मुदत संपते तेव्हा गुंतवणूकदाराला त्याच्या मूळ रकमेसह त्यावर व्याजसुद्धा हमखास मिळत असते. बाँड्समध्ये गुंतवणूकदाराला निश्चित परतावा मिळणार याची हमी असल्यामुळे गुंतवणूक करताना भीती वाटत नाही.

type of bonds in marathi

जाणून घ्या.

महिन्याचा पगार कुठे आणि कसा गुंतवायचा?

बॉण्ड्सचे विविध प्रकार | Type Of Bonds

अ क्रबॉण्ड्सचे प्रकारकोण जारी करतेReturnsजोखीम Risk
१.सरकारी बॉण्ड्सकेंद्र-राज्य सरकारकमीकमी
२.म्युनिसिपल बॉण्ड्सनगरपालिका, सरकारी संस्थाकमीअधिक
३.कॉर्पोरेट बाँड्सकंपनीजास्तजास्त
४.मालमत्ता-बॅक्ड सिक्युरिटीजबँक, वित्तीय संस्थाकमीकमी
5.सोवरेन गोल्ड बॉन्ड (SGB)रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकमीकमी
6.आरबीआई बॉन्डरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकमीकमी

बाँडमध्ये गुंतवणूक करावी कि नाही?

  • बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध गुंतवणुकीच्या साधनांपेक्षा बाँडमध्ये केलेली गुंतवणूक हि कमी जोखमीची असते.
  • बरेच बाँड सरकार किंवा सरकारी संस्था जारी करत असल्यामुळे त्यावर सरकारचे व रिझर्व बँक ऑफ इंडिया चे नियंत्रण असते त्यामुळे अशा बाँडमध्ये गुंतवणूक केल्यास सुरक्षेची हमी एकप्रकारे सरकारच घेत असते.
  • बाँडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळत असतो त्यामुळे तुम्हाला ठराविक अंतराने उत्पन्न देणारे हे उत्तम साधन  आहे.
  • थोडी रिस्क घेण्याची तयारी असेल तर असे गुंतवणूकदार काही कॉर्पोरेट बाँड्स मध्ये गुंतवणूक करू शकतात कारण सरकारी रोख्यांपेक्षा यामध्ये जास्त उत्पन्न मिळते.

FAQ : नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Yield in Bonds म्हणजे काय?

रोख्यांचे उत्पन्न (bond’s yield) म्हणजे गुंतवणूकदाराला त्याच्या bond’s मुदतीपर्यंत प्रत्येक वर्षी मिळणारा परतावा होय. ज्या गुंतवणूकदारांनी बाँड खरेदी केले आहे त्यांना बाँडचे उत्पन्न bond’s yield हे जोपर्यंत त्यांच्याजवळ bond’s ची मालकी आहे तोपर्यंत सातत्याने मिळत असतात. हे उत्पन्न तुमच्या bond’s च्या किंमतीवर आबी त्याच्या धारण कालावधीवर अवलंबून असते.

bond yields वाढली तर काय होते?

बाँडची किंमत वाढली तर ते विद्यमान बाँडधारकांच्या विरोधात कार्य करते. कारण बॉण्डचे उत्पन्न आणि बाँडच्या किमती यांच्यामध्ये परस्पर विरोधी संबंध आहे. जेव्हा बाँडचे उत्पन्न वाढते तेव्हा सध्याच्या बाँडच्या किमती कमी होतात. त्यामुळे बाँड धारकांसाठी हे नुकसानकारक ठरते. बाँड हे  पुरवठा आणि मागणीच्या सिद्धांतावर कार्य करत असतात. जेव्हा बाँड्सची मागणी कमी होते, तेव्हा नवीन बाँड जारी करणाते लोक खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी जास्त उत्पन्न देत असतात.

Bonds coupon rate म्हणजे काय?

कूपन दर (Coupon rate) म्हणजे बाँड जारीकर्त्यांद्वारे बाँडच्या दर्शनी मूल्यावर दिलेला व्याज दर होय. बाँड जारीकर्त्यांद्वारे त्याच्या खरेदीदारांना नियतकालिक प्रमाणे दिलेला व्याज दर म्हणजेच Coupon rate होय. कूपन दर बॉण्डच्या दर्शनी मूल्यावर (किंवा सममूल्य) मोजला जात असून तो बाँडच्या इश्यू किंमत किंवा बाजार मूल्यावर मोजल्या जात नाही.


लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top