इंडेक्स फंड म्हणजे काय? | Index Fund

शेअर बाजामध्ये गुंतवणूक करताना जोखीम हा शब्द फार महत्वाचा आहे. पण हीच जोखीम कमी करण्यासाठी हुशार गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीत विविधता आणण्याचा प्रयत्न करतात. इक्विटी गुंतवणूक बाजारातील जोखीम कमी करण्याची एक सर्वसामान्य आणि प्रसिद्ध पद्धत आजवर सिद्ध झालेली आहे.

बाजारात आजरोजी उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये इंडेक्स फंड समाविष्ट करू शकता. बाजारामध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार वेगवेगळ्या माध्यमांत जसे इक्विटी, रिअल इस्टेट, बॉण्ड्स, सोने इत्यादींमध्ये त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतात.

इंडेक्स फंड म्हणजे काय?- What is Index fund?

इंडेक्स फंड म्हणजेच शेअर मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध इंडेक्स मध्ये केलेली गुंतवणूक होय. उदारणार्थ : सेन्सेक्स, निफ्टी, मिडकॅप इंडेक्स इत्यादी.

इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला शेअर निवडण्याची गरज नसते. आजरोजी क्या कंपनीचे शेअर इंडेक्स मध्ये समाविष्ट असतात अशा शेअरमध्ये तुहाला फक्त समान प्रमाणात गुंतवणूक करावी लागते.

इंडेक्स मध्ये आधीपासूनच शेअर ठरलेले असतात जसे की सेन्सेक्स मध्ये 30 शेअर निफ्टी मध्ये 50 शेअर त्यामुळे तुम्हाला स्वतः वेगळे शेअर निवडण्याची आवशकता पडत नाही. त्यामळे या इंडेक्स मध्ये जशी वाढ-घट होईत त्याचप्रमाणात तुमच्या इंडेक्स फंड मधील नफा-नुकसान ठरविल्या जाईल.

Index Fund

इंडेक्स फंड चे फायदे

  • इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त अनुभवाची गरज पडत नाही. कारण इंडेक्स मध्ये असलेल्या कंपन्यांची संख्या यापूर्वीच निवडलेली असल्यामुळे तुम्हाला त्या कंपन्यांबद्दल वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही.
  • इंडेक्स फंडमध्ये केलेली गुंतवणूक हि त्या इंडेक्स मधील सर्व कंपन्यांच्या शेअर्स मध्ये समप्रमाणात केली जाते त्यामुळे धोका कमी होतो.
  • जसजशी इंडेक्सची किंमती वाढेल तसा आपला इंडेक्स फंड देखील वाढेल आणि त्यातून आपल्याला नफा मिळेल.
  • कमी जोखमेमध्ये सातत्यपूर्ण परतावा Returns हवे असतील तर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करू शकता.
  • इंडेक्स फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर इतर माध्यमांपेक्षा कमी परतावा मिळत असला तरी त्यामध्ये रिस्क सुद्धा कमी असते. सर्वात भरवशाचा गुंतवणूक प्रकार म्हणून इंडेक्स फंड सर्वांच्या आवडता आहे.

प्रमुख इंडेक्स फंड

1निफ्टी 50
2निफ्टी बँक
3निफ्टी 500
4निफ्टी स्मॉल कॅप 250
5निफ्टी नेक्स 50
6निफ्टी मिड कॅप 150
7सेन्सेक्स फंड

हेही वाचा : स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय?

प्रमूख इंडेक्स फंड कंपन्या

1UTI Nifty Index Fund
2HDFC Index Fund
3ICICI Prudential Mutual Fund
4SBI Nifty Index Fund
5Motilal Oswal S&P 500 Index Fund
6Axis Nifty 100 Index Fund
7Franklin India Index Fund
लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top