म्युच्युअल म्हणजे आपसी, सर्वांनी मिळून, एकमेकांनी असा होतो. म्हणूनच म्युच्युअल फंड Mutual Fund म्हणजे “ एकमेकांनी सहकार्याने एखाद्या फंड मध्ये केलेली गुंतवणूक होय.”
आता या ठिकाणी एकमेकांनी गुंतवणूक करणे म्हणजे “ मोठमोठे शेअर बाजार तज्ञ इतरांकडून पैसे गोळा करून त्यांच्या अनुभवाचा फायदा इतरांना करून देत त्यांचे पैसे शेअर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांत जसे शेअर्स , बॉण्ड्स, डेबेंचर ,गोल्ड मध्ये काहीप्रमाणात शुल्क आकारून गुंतवणूक करतात.” यालाच आपण फंड व्यवस्थापक यांनी केलेली गुंतवणूक म्हणजेच म्युच्युअल फंड Mutual Fund असे म्हणतो.”
भारतातील पहिल्या म्युच्युअल फंडची सुरुवात १९६३ साली झाली. शेअर बजामध्ये नव्यानेच आलेला गुंतवणूकदार ज्याला या बाजाराबद्दल काहीच माहिती नसते अशावेळी त्याने केलेली गुंतवणूक फसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परंतु म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला कोणत्याच अनुभवाची आवशकता पडत नाही. तुमचा सर्व भार म्युच्युअल फंड सांभाळणाऱ्या कंपन्या घेतात आणि त्या बदल्यात तुमच्याकडून काही रक्कम आकारतात यालाच म्युच्युअल फंड कंपन्या ” एन्ट्री लोड” असे म्हणतात.
म्युच्युअल फंडचे फायदे
१. कमी भांडवलात गुंतवणूक
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला जास्त भांडवलाची म्हणजेच पैशाची गरज पडत नाही. त्यासाठी तुम्ही गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून SIP ची निवड करू शकता. यामध्ये तुम्हाला कमी भांडवलामध्ये गुंतवणूक करता येते आणि जास्त नफा मिळवता येतो.
२. कमी जोखीम Low Risk
Mutual Fund मध्ये केलेल्या गुंतवणुकीमध्ये शेअर बाजारातील इतर गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम स्वीकारावी लागते. कारण तुमचे पैसे हे कोणत्याही एकाच कंपनीमध्ये गुंतवले जात नसून विविध कंपन्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची विभागणी केली जाते. त्यामुळे तुमचे संभाव्य धोके हे फारच कमी होतात.
३. अनुभवाची आवशकता नाही
Mutual Fund मध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला फार मोठ्या अनुभवाची आवशकता पडत नाही. शेअर बाजाराचे सामान्य ज्ञान ठेवणारा कोणताही व्यक्ती म्युच्युअल फंड गुंतवणूक करू शकतो.
तुम्हाला कोणती कंपनी कोणते काम करते, किती नफा मिळवला, त्यावर किती कर्ज आहे अशाप्रकारच्या कोणत्याच बाबींची चिंता करण्याची आवशकता नसते. त्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक सांभाळणाऱ्या कंपनीकडे तज्ञ लोकांची टीम सदैव तत्पर असते त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा तुम्ही घेऊ शकता.
४. SIP ची सुविधा
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीसाठी तुम्हाला एकावेळी तुमची सर्व रक्कम गुंतवण्याची गरज नाही. तुम्ही SIP च्या माध्यमातून दरमहा किंवा काही ठराविक कालावधी नंतर तुमच्या सोयीनुसार Mutual Fund मध्ये गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुम्हाला सातत्यपूर्ण गुंतवणूक करण्याची चांगली सवय लागून त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होतो.
५. Lumpsum गुंतवणुकीची सुविधा
म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला जर एकावेळी तुमची सर्व रक्कम गुंतवायची असेल तर त्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये Lumpsum गुंतवणूक करू शकता. पडलेल्या बाजारामध्ये Lumpsum गुंतवणूक केली तर तुम्हाला कमी किमतीमध्ये म्युच्युअल फंड चे जास्त युनिट मिळू शकतात त्याचा फायदा भविष्यात जेंव्हा मार्केट वाढेल तेंव्हा तुम्हाला नक्कीच होईल.
6. Compounding Effect
म्युच्युअल फंड केलेल्या गुंतवणुकीवर Compounding Effect लागू होत असल्यामुळे तुमचा गुंतवणूक केलेला पैसा त्याप्रमाणे वाढतो. जेवढ्या जास्त कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक कराल तेवढा जास्त Return तुम्हाला Compounding Effect मिळवून देईल.
वाचा : SIP आणि Lumpsum काय फरक आहे?
7. ठराविक परताव्याची हमी Returns
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे हे एक मुख्य कारण आहे. ज्यावेळी आपण शेअर बाजाराचा विचार करतो त्यावेळी अस्थिरता आणि जोखीम आठवतात. पण Mutual Fund मध्ये केलेली गुंतवणूक बाजारातील हे संभाव्य धोके काही प्रमाणात कमी करून तुंम्हाला सातत्यपूर्ण परतावा मिळवून देण्याचा एक उत्तम मार्ग ठरते.
म्युच्युअल फंड व्यवस्थापक तुमचे पैसे विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे बाजारातील चढ-उताराचा तुमच्या परताव्यावर Returns जास्त परिणाम होत नाही.
8. कधीही म्युच्युअल फंडातून बाहेर पडू शकता
गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या जवळ रक्कम उपलब्ध आहेत तोपर्यंत तुम्ही विनाखंड गुंतवणूक करा. पण आवशकता पडल्यास तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंड मधून केंव्हाही बाहेर पडू शकता. त्यासाठी तुम्हाला नाममात्र शुल्क आकारण्यात येऊन लवकरच तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
9. ऑनलाईन सुविधा
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आज सर्वच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. आता गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला ब्रोकर ऑफिसला जायची गरज पडत नाही तर एका दिवसात म्युच्युअल फंडची सुविधा देणाऱ्या ब्रोकरकडे तुम्ही ऑनलाईन खाते उघडून गुंतवणूक करू शकता.
10. सुरक्षितता
म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक हि सरकारी यंत्रणेद्वारे नियंत्रित केली जात असल्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही गुंतवणूक केलेला पैसा हा सरकारकडे सुरक्षित असून एखाद्यावेळी ब्रोकरचे दिवाळे निघाले तरी तुमच्या गुंतवणुकीवर त्याचा कोणताच परिणाम होत नाही. आणि तुमची गुंतवणूक नेहमीच सुरक्षित राहून धोका कमी होतो.