New Fund Offer (NFO) म्हणजे काय?

New Fund Offer

नवीन फंड ऑफर म्हणजे काय?

NFO म्हणजे न्यू फंड ऑफर (New Fund Offer). “ गुंतवणूक कंपनीने गुंतवणूकदारांना सादर केलेल्या फंड समभागांची units ची सुरवातीच्या काळामध्ये केलेली विक्री होय.” जेव्हा एखादी म्युच्युअल फंड योजना सर्वप्रथम गुंतवणूकदारांना त्यांचे युनिट ऑफर करते, तेव्हा त्याला नवीन फंड ऑफर असे म्हणतात.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर, कोणतीही नवीन फंड योजना ही शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) प्रमाणेच असते.

जेंव्हा एखाद्या कंपनीला किंवा म्युच्युअल फंड यांना बाजारामध्ये भांडवल उभारणीची आवशकता असते तेंव्हा ते  (IPO) प्रमाणेच एनएफओ बाजारात आणतात आणि त्याद्वारे बाजारामध्ये आपल्या भविष्यातील कामांसाठी भांडवलाची उभारणी करतात.

New Fund Offer कधी सुरु करतात?

कधी कधी मालमत्ता व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनाची बास्केट वाढवण्यासाठी एनएफओ बाजारामध्ये आणतात. व्यवस्थापनाच्या मालकीखाली अधिक मालमत्ता असण्यासाठी NFO लाँच केले आहे. म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधील विविध योजनांसाठी NFO लाँच केले जातात.

गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा NFO सुरू करण्यात आले आहेत.

New Fund Offer meaning in marathi

NFO मध्ये गुंतवणूक करावी कि नाही?

नवीन फंड ऑफर (NFO) म्हणजे गुंतवणूक कंपनीने गुंतवणूकदारांसाठी जारी केलेल्या फंड units ची सुरुवातीची विक्री असल्यामुळे तुम्ही त्या फंडाचा मागील इतिहास जाणून घेऊ शकत नाही. जसे यापूर्वी त्या फंड मधून किती टक्के परतावा returns गुंतवणूकदारांना मिळाले किंवा किती नुकसान झाले याची उपलब्ध नसते.

म्हणूनच अनुभवी गुंतवणूकदार अशा फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला नवीन गुंतवणूकदारांना कधी देत नाहीत. जोखीम घेण्याची तुमची तयारी आणि मानसिकता असेल तर अशा NFO मध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही पण अतिउत्साहात चुकीची गुंतवणूक करण्याचा सल्ला आम्ही अजिबात देत नही.

एनएफओ हे बाजारात उपलब्ध असणाऱ्या विद्यमान फंडांपेक्षा स्वस्त असतात .

Index Fund म्हणजे काय?

नवीन फंड ऑफरचे फायदे काय आहेत?

नवीन फंड ऑफरिंगमुळे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाची एनएव्ही निश्चित होण्यापूर्वी त्याचे युनिट्स कमी किंमतीवर खरेदी करता येतात, ज्यामुळे त्यांना दीर्घकाळात नफा मिळवता येतो. म्युच्युअल फंड जाहीर झाल्यानंतर, फंडाचे प्रत्येक युनिट मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना जास्त किंमत मोजावी लागते.

एनएफओ चा जास्तीत जास्त कालावधी किती आहे?

एनएफओ बाजारात जास्तीत जास्त ३० दिवसांच्या कालावधी पर्यत सक्रीय राहू शकतो.

लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top