Swing Trading म्हणजे काय? | What Is Swing Trading?

What Is Swing Trading
What Is Swing Trading?

Swing Trading म्हणजे काय? | What Is Swing Trading?

स्विंग ट्रेडिंग ही ट्रेडिंगची एक प्रसिद्ध पद्धत आहे, ज्यामध्ये ट्रेडर काही दिवसांपासून अनेक आठवड्यांच्या कालावधीत स्टॉकमध्ये अल्प-मध्यम मुदतीचा नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. स्विंग ट्रेडर प्रामुख्याने ट्रेडिंगच्या संधी शोधण्यासाठी technical analysis वापर करतात. या ट्रेडिंगमध्ये प्रामुख्याने एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेड घेत असताना त्या स्टॉकमधील किंमतीमध्ये येणारे चढ-उतार पकडण्याचा प्रयत्न ट्रेडर करत असतो. कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा स्विंगट्रेडिंग हा उत्तम प्रकार आहे.

एखाद्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यानंतर २-३% नफा मिळाला कि तुम्हाला त्या ट्रेडमधून बाहेर पडता येते त्यासाठी महिना किंवा वर्षभर वाट बघण्याची गरज स्विंग ट्रेडिंगमध्ये पडत नाही. मार्केट बिअरीश म्हणजेच खाली जाणारे असो किंवा बुलीश म्हणजेच वर चढणारे असो Swing trading दोन्ही प्रकारच्या मार्केट मध्ये करता येते. स्विंग ट्रेडिंग हा long-term आणि intraday या दोन्हीपेक्षा वेगळा असून ट्रेडिंगचा एक फायदेशीर प्रकार आहे. स्विंग ट्रेडिंग कशा प्रकारे केल्या जाते याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत. स्विंग ट्रेडिंग करताना खालील बाबींचा नेहमी विचार करायला हवा.

स्विंग ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे | Advantages and Disadvantages of Swing Trading

शेअर मार्केटमध्ये कोणत्याही ट्रेडिंग पद्धतीचे फायदे आणि तोटे हे असतातच. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करताना या दोन्ही बाजूंचा विचार होणे गरजेचे आहे.

स्विंग ट्रेडिंगचे फायदे | Advantages of Swing Trading

  • १. स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला ज्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे त्या कंपनीच्या फंडामेंटल किंवा मुलभूत बाबींबद्दल माहिती करण्याची जास्त आवशकता पडत नाही.
  • २. स्विंग ट्रेडिंगमध्ये ट्रेड घेण्यासाठी एक-दोन तासांचे चार्ट रीडिंग पुरेसे ठरते. त्यासाठी दिवसेंदिवस अभ्यास करण्याची आवशकता नसते.
  • ३. स्विंग ट्रेडिंग करताना तुमचे पैसे जास्त कालावधीसाठी त्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतून पडत नाहीत. गरजेपुरता नफा मिळाल्यानंतर तुम्हाला स्टॉकमधून बाहेर पडता येते.
  • ४. स्विंग ट्रेडिंग मधील ट्रेड जास्त करून एक-दोन दिवस ते काही आठवडे एवढ्या मर्यादेपर्यंत घेतल्या जातात.

What Is Swing Trading?

What Is Swing Trading

स्विंग ट्रेडिंगचे तोटे | Disadvantages of Swing Trading

  • १. स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करताना फक्त त्या कंपनीच्या स्टॉकचा चार्ट बघत असल्यामुळे चार्ट नुसार तुम्ही त्यात ट्रेड घेत असता, परंतु कधी-कधी चार्ट बरोबर असतो पण कंपनीचे फंडामेन्टल बरोबर नसतील तर त्याठिकाणी तुम्ही अडचणीत सापडण्याची जोखीम असते.
  • २.  स्विंग ट्रेडिंग मध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असल्यामुळे तुंम्हाला त्या कंपनीच्या शेअर मधून मिळणाऱ्या dividend पासून होणाऱ्या फायद्यांपासून वंचित राहावे लागते.
  • ३. स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही Over Night Position घेत असल्यामुळे सुट्टीच्या दिवसांत जर त्या कंपनीबाबत एखादी वाईट बातमी आली तर त्याचा परिणाम त्या कंपनीच्या शेअर वर होऊन तुम्हाला नुकसान स्वीकारावे लागू शकते.
  • ४. Swing traders कमी कालावधीसाठी ट्रेड घेत असल्यामुळे ते कंपनीच्या शेअरमधील longer-term trends पासून वंचित राहतात आणि छोटासा नफा घेऊन ट्रेडच्या बाहेर पडतात.

हेही वाचा : Dividend म्हणजे काय?

Swing Trading करण्यासाठी टिप्स | Swing Trading Tips

१. स्विंग ट्रेडिंग करताना नेहमी कोणत्याही शेअर मध्ये एन्ट्री करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या जागी एक्झिट करायची आहे किंवा किती टक्के नफा मिळाला म्हणजे तुम्हाला ट्रेडमधून बाहेर पडायचे आहे हे आधीच ठरवा.

२. स्टॉकमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर तुमचा Stop Loss ठरवून त्याला न हलवता त्याचे नियम पाळा. वारंवार Stop Loss मध्ये बदल करू नका.

३. जास्त लोभ न करता नियमित प्रोफिट कसा मिळवता येईल याकडे लक्ष द्या.

४. सर्वच पैसे एका ट्रेड मध्ये किंवा स्टॉकमध्ये न गुंतवता पैशांची योग्य विभागणी करून गुंतवणूक करा.

५. तुमच्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाही किंवा त्याला धक्का लागणार नाही अशीच तुमची पोझिशन साईज असली पाहिजे नाहीतर विनाकारण तुम्ही ठरलेल्या टार्गेटपूर्वीच भीती वाटून मोठा लॉस घेऊन त्या ट्रेडमधून बाहेर व्हाल.

६. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रयत्न करू नका असे स्टॉक तुम्हाला कमी पैशात श्रीमंत करण्याची भुरळ पाडून एक दिवस कंगाल (दिवाळखोर) केल्याशिवाय राहणार नाहीत.

७. योग्य वेळेची वाट बघायला शिका. स्टॉकच्या चार्टवर अमुक एक pattern तुमच्या आवडीचा दिसला म्हणून लगेच घाई-घाईने ट्रेडमध्ये एन्ट्री न घेता तुमचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय एन्ट्री करू नका.

८. टेलिग्राम / Whatsapp वर मिळालेल्या टिप्स नुसार ते सांगतात म्हणून कोणताच निर्णय न घेता त्या टिप्स बद्दल पूर्ण खात्री करून तुमचा स्वतःचा अभ्यास करूनच ट्रेड घेण्यावर भर द्या.

Swing Trading Profitable आहे काय?

होय, स्विंग ट्रेडिंग इतर ट्रेडिंग प्रकारांपेक्षा नफा मिळवून देणारी पद्धत आहे. शेअर बाजारामध्ये पैसे कमावण्याचे विविध मार्ग आहेत त्यातीलच एक मार्ग आहे ” स्विंग ट्रेडिंग”. स्टॉकची निवड करताना तुम्ही सर्वप्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. स्विंग ट्रेडिंगसाठी तुमच्याकडे सैयम असणे गरजेचे आहे. लहान नफा घेऊन बाहेर पडण्याची सवय स्विंग ट्रेडिंगमध्ये उपयोगी पडत नाही.

तुम्ही तुमच्या ट्रेडिंग पद्धतीमध्ये ठरवल्यानुसार टार्गेट येईपर्यंत वाट बघितली पाहिजे आणि ठरलेला Stop Loss तुम्हाला काटेकोरपणे पाळता आला पाहिजे. अति लालसी न बनता ठरलेल्या टार्गेटवर तुमचे कायम लक्ष असले पाहिजे.

असे केले तरच स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही यशस्वी आणि नफा मिळवणारे ट्रेडर बनू शकता.

सारांश | Conclusion

स्विंग ट्रेडिंग पैसा कमवण्याची एक उत्तम ट्रेडिंग पद्धत मानली जाते पण त्याचा योग्य वापर करता येणे गरजेचे आहे नाहीतर त्यापासून तुम्हाला फायदा घेता येणार नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण सराव आणि अनुभव हे दोन उत्तम मार्ग आहेत. लहान-लहान ट्रेड घेऊन त्याचा सराव तुम्ही करू शकता आणि एकवेळ तुम्हाला या पद्धतीचा योग्य पुरेपूर अनुभव आला कि तुम्हाला सातत्यपूर्ण नफा मिळविण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. अशाप्रकारे आपल्याला स्विंग ट्रेडिंगबद्दल (What Is Swing Trading?) माहिती सांगता येते.

फुकटच्या सल्लागारांपासून आपण नेहमी सावध असायला पाहिजे. असे लोक नफा मिळवलेले चुकीचे आणि बनावट स्क्रीनशॉट दाखवून तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढू शकतात अशावेळी वेळीच सावध होऊन अशा फसव्या जाहिरातींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. त्याउलट स्वतः थोडी मेहनत घेऊन अभ्यास करून चांगल्या कंपनीची निवड करूनच आपले पैसे त्यामध्ये गुंतवले पाहिजेत.

लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top