महिन्याचा पगार कुठे आणि कसा गुंतवायचा? | Where To Invest Your Monthly Salary

Where To Invest Your Monthly Salary
Where To Invest Your Monthly Salary

महिन्याचा पगार कुठे आणि कसा गुंतवायचा?

वाढत्या महागाईच्या काळामध्ये फक्त एकाच उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहणे हासुद्धा मूर्खपणा ठरतोय. Where To Invest Your Monthly Salary या प्रश्नाचे उत्तर माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये जर स्टॉक गुंतवणूक फक्त श्रीमंतांसाठी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

भारतीय शेअर बाजारात मागच्या काही वर्षांत किरकोळ आणि लहान गुंतवणूकदारांच्या (retail and small investors) संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आजच्या हुशार आणि माहितगार गुंतवणूकदारांना मुख्य म्हणजे योग्य आर्थिक नियोजनासह गुंतवणूक करणे, स्वतःचे बजेट निवडणे आणि अल्प-मुदतीचे, मध्य-मुदतीचे आणि दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय निवडणे तंत्रज्ञानाच्या मदतीने सोयीचे झाले आहे.

गुंतवणूक म्हणजे आपण साठवलेला पैसा कामाला लावणे आणि त्याला योग्य पद्धतीने वाढवणे हे गरजेचे बनले आहे. भारतात स्वयंरोजगार असो किंवा पगारदार, गुंतवणूक केल्याने तुम्हाला सेवानिवृत्तीसाठी आवश्यक पैसा तयार करण्यात मदत होते.

शेअर बाजारातील गुंतवणूक तुम्हाला तुमच्या तात्काळ आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी निरोगी बचत जमा करण्यास सक्षम बनवते. जर तुम्ही तुमच्या वयाच्या 20 मध्येच गुंतवणूक करण्यास सुरुवात करत असाल तर तुम्हाला तुमची संपत्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळवता येतो.

याचा अर्थ आज उशीर झालेला आहे असा नाही कारण जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे काळजीपूर्वक नियोजन केले तर उशीरा सुरुवात करण्यात फारमोठे नुकसान नाही. तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्याचे रक्षण करण्यासाठी तुमचा पगार हुशारीने कसा गुंतवायचा याबद्दल | Where To Invest Your Monthly Salary आपण माहिती घेणार आहोत.

पगाराची गुंतवणूक करताना काय बघावे | Things to consider while investing your salary

महिनाभर कष्ट करून मिळवलेला पगार गुंतवताना कोण-कोणत्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१. महिन्याचा जमाखर्च | Monthly Budget

तुमचा महिन्याचा पगार खात्यामध्ये जमा झाल्यानंतर गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला जीवनावश्यक गोष्टींसाठी आवश्यक रक्कम बाजूला करून, घरघुती खर्च, घरभाडे आणि इतर खर्चाचा ताळमेळ बसल्यानंतर एकूण पगाराच्या किमान २०% रक्कम तुम्ही महिन्या शेवटी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यानुसार तुमचे नियोजन असणे आवश्यक आहे.

२. कंपाउंडिंग | Compounding Effect

गुंतवणूक करताना किती रक्कम तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड किंवा शेअर मध्ये गुंतवली याला जास्त महत्व नसून तुम्ही किती काळासाठी ती रक्कम गुंतवून ठेवता हे महत्वाचे आहे. कंपाउंडिंग म्हणजे गुंतवणुकीद्वारे तुमचे पैसे गुणाकार पद्धतीने वाढवण्याची एक संकल्पना आहे.

तुम्ही जितका वेळ पैसा बाजारात राहू द्याल तितका तो वाढतो Compounding Effect नुसार वाढत जातो आणि अधिक नफा मिळवून देतो.

३. महागाईचे प्रमाण  | Inflation Rate

आर्थिक भाषेमध्ये चलनवाढ म्हणजे पैशाची क्रयशक्ती (purchasing power) हळूहळू कमी होणे. शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत कंपाऊंडिंगमुळे तुमचे पैसे वेळेनुसार वाढण्यास मदत होते, तर महागाईमुळे त्याचे मूल्य हळू-हळू कमी होते. त्यामुळे पैसे गुंवताना महागाई वाढीचा दर Inflation Rate लक्षात घेणे गरजेचे आहे.

कारण जर महागाई हि दरवर्षी ८% या प्रमाणात वाढत असेल तर तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेवर तुम्हाला किमान १२% परतावा Return मिळणे आवश्यक आहे तरच महागाई दर आणि तुमची गुंतवणूक यांचा ताळमेळ बसून तुमचे पैसे वाढतील.

४. गुंतवणुकीवरील धोका | Risk On Investment

शेअर बाजारामध्ये केलेल्या गुंतवणुकीत नेहमीच जोखीम समाविष्ट असते.आपण केलेल्या शेअर बाजारातील गुंतवणुकीचा पर्याय व्यवहार्य असतो जेव्हा संबंधित जोखीम आजच्या महागाईवर मात करू शकते.

उदाहरणार्थ, बँकेत Fix Deposit ठेवणे हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित प्रकार आहे परंतु वाढत्या महागाईच्या तुलनेत त्यातून मिळणारे Return कमी आहेत.पण दुसरीकडे, शेअर बाजारातील इक्विटी, म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक धोकादायक मानली जाते पण त्यातून मिळणारे परतावे Return हे सुधा जास्त असतात.

Where To Invest Your Monthly Salary

Where To Invest Your Monthly Salary

महिन्याचा पगार कुठे गुंतवणूक करावा | Where to invest Your Monthly Salary

पगाराची गुंतवणूक करण्यासाठी भरपूर पर्याय आजच्या काळामध्ये उपलब्ध आहेत त्यातील काही महत्वाचे प्रकार आज आपण बघणार आहोत.

१. म्युच्युअल फंड | Invest In Mutual funds

जेंव्हा तुमच्याकडे कमी प्रमाणात पैसा उपलब्ध असतो त्यावेळी शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. वास्तविक पाहता नोकरदार व्यक्तींनी 50:30:20 नियमांचे पालन करून गुंतवणूक करावी.

ज्यामुळे तुमच्या पगारातील उत्पन्नातील रक्कम 50 टक्के गरजांवर, 30 टक्के इच्छांवर आणि 20 टक्के म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर खर्च करण्याचे नियोजन करणे सोयीचे होते.

म्युच्युअल फंड सांभाळणारे मंडळ तुमचे पैसे शेअर बाजार इक्विटी, कर्ज योजना किंवा दीर्घकालीन गुंतवणूक क्षमता असलेल्या बाबींमध्ये गुंतवून तुम्हाला योग्य परतावा मिळवून देतात. आज शेकतो Mutual funds बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्यातून योग्य Mutual funds ची निवड करू शकता.

२. इक्विटी-लिंक्ड बचत योजना | Equity-linked savings plans ELSS

पगारदार वर्गाला कर सवलती देण्यासाठी ही योजना प्रसिद्ध आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास कलम 80c अंतर्गत गुंतवणूकदारांना 1,50,000 रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळू शकतो.

जर तुम्ही जास्त पगाराच्या श्रेणीमध्ये येत असाल, तर ईएलएसएस ELSS योजना तुम्हाला इतर बचत पर्यायांपेक्षा जास्त परतावा Returns मिळवून देताना कर वाचविण्यात मदत करू शकते. पण, ELSS योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे.

म्हणजेच तुम्हाला किमान तीन वर्षे तरी तुमचे पैसे त्यामधून काढता येणार नाहीत.

३. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी | Employee Provident Fund

तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी मोठा निधी तयार करू इच्छित असाल तेंव्हा EPF हे एक बुद्धिमान गुंतवणूकचे साधन तुमच्यासाठी ठरू शकते. तुम्ही EPF मध्ये गुंतवणुकीसाठी तुमच्या ऑफिसमध्ये लीपिकाजवळ 80c अंतर्गत कर कपातीचा tax deduction दावा देखील करू शकता. Employee Provident Fund मध्ये तुम्ही ठरलेले विशिष्ट निकष पूर्ण केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटी रकमेवरही कर सवलत मिळू शकते.

४. मुदत ठेवी | Fixed deposits

सर्वांच्या परिचयाची मुदत ठेव योजना परिपक्वतेवर maturity निश्चित परतावा return असलेली सर्वात सुरक्षित गुंतवणूक पद्धती आहे. एफडी परताव्यावर बाजारातील अस्थिरतेचा कोणताच परिणाम होत नसतो. म्हणूनच, Fixed deposits हे अल्प आणि मध्यम मुदतीच्या आर्थिक धोरणांसाठी उत्तम पर्याय आहेत. वाढत्या कर प्रणालीमध्ये एफडी चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळते.

५. सोने | Gold

फार पूर्वीपासूनच मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करणे भारतीय गुंतवणूकदारांची आवडती पद्धत आहे.आज  पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करण्या व्यतिरिक्त, गुंतवणूकदार गोल्ड बाँड्स आणि गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात.

सोन्यामधून मिळणारा परतावा returns बाजाराशी जोडलेला असतो, जो शेअर बाजारातील इक्विटी मार्केटशी उलट असतो. याचा अर्थ असा की जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये अस्थिरता वाढते तेव्हा सोन्याची मागणी वाढते. सोने हा गुंतवणुकीचा पारंपारिक आणि सर्वमान्य पर्याय असून त्यामध्ये हुंताव्णूक करणे नेहमीच फायदेशीर ठरते.

लेख शेअर करा.
– पुढील लेख –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top